पाकव्याप्त काश्मीरही घेणार -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
भारतीय सैन्यात आधीपासूनच चांगली क्षमता आहे. मात्र यापूर्वीचे नेतृत्व चांगले नव्हते. त्यामुळेच चीनने आपला हजारो एकरचा भूभाग बळकावला आहे. आधीच्या नेतृत्वात क्षमता नव्हती.
मात्र आम्ही सर्जिकल स्ट्राइक केला. आमच्या जवानांना मारल्यानंतर आम्हीही तुमच्या जवानांना मारू शकतो हे दाखवून दिलं.कलम 370 हटवून कश्मीरला भारताशी जोडले. (Devendra Fadnavis) आणि आता पाकव्याप्त काश्मीरही घेणार आणि अखंड भारतासाठी प्रयत्न करणार असल्याचे उद्गार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. देवेंद्र फडणवीस पुण्यात एका कार्यक्रमात बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली शक्तिशाली आणि समर्थ भारत घडतो आहे. सध्याचा भारत हा आत्मविश्वासाने भरलेला आहे. यावेळी बोलताना फडणवीस यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना देखील लक्ष केलं. राहुल गांधी यांनी सर्जिकल स्ट्राइक केल्याचे पुरावे मागितले. यावेळी ज्यांच्या घरातील लोक दहशतवादी हल्ल्यात मारले गेले असतील त्यांना काय वाटले असेल असा विचार माझ्या मनात येतो.
याच कार्यक्रमात बोलत असताना देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 14 ऑगस्ट रोजी विभाजन दिन पाळावा असं आवाहन केले. (Devendra Fadnavis) इस्रायल ची भूमी 2000 वर्षे त्यांच्यापासून दूर होते परंतु शेवटी त्यांनी ती मिळवलीच.आपल्या भूमीचाही एक तुकडा त्यादिवशी वेगळा झाला. त्याचं शल्य जिवंत ठेवायचा आहे. अखंड भारत केल्यानंतरच ते शल्य संपेल असेही ते म्हणाले.