ताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचे

Iran Protest : इराण रक्ताळला! १६,००० हून आंदोलकांची थेट गोळ्या झाडून हत्या; भयावह फोटो पाहून…


डिसेंबरपासून सुरु असलेल्या इराणमधील आंदोलनात हजारोंचा बळी
सर्वोच्च नेते खामेनेईन केले अमेरिकेवर आरोप
लोकांच्या थेट डोक्यात, छातीत घातल्या गोळ्या

 

Iran Protest Death Toll : तेहरान : इराणमध्ये डिसेंबर २०२५ च्या अखेरीस सरकारविरोधात आंदोलन सुरु झाले होते

या आंदोलनाची सुरुवात ही देशातील वाढती महागाई, बेरोजगारी, जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत वाढ आणि इराणचे चलन रियालची घसरण याविरोधात सुरु झाले होते. पण पुढे या आंदोलन थेट इस्लामिक लोकशाहीच्या आणि खामेनेई सरकारच्या विरोधात रुपांतरित झाले. या आंदलोनामुळे देशात भयंकर परिस्थिती निर्माण झाली होती. याला चिरडण्यासाठी सरकारने बळाचा वापर केल्याने हे आंदोलन अधिक चिघळले होते.

 

सुविस्तर माहिती येथे पहा !

 

इराणमध्ये राजधानी तेहरानसह, मशहद, इस्पाहन आणि शिराजमध्ये लाखो लोक खामेनेई सरकारविरोधात रस्त्यावर उतरले होते. या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर जाळफोळ, तोडफोड करण्यात आली. या आंदोलनाना दाबण्यासाठी सरकारने सुरक्षा दलांनी कठोर कारवाईचे आदेश दिले होते. यावेळी सुरक्षा दलांनी आंदोलकांवर गोळीबार केला. अनेकांनी ताब्यात घेतले. मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांच्या गोळीबारात १६,५०० लोकांचा मृत्यू झाला आहे. लोकांना थेट डोक्यात, छातीत गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. याचा जागतिक स्तरावर मानवाधिकार संघटनांनी तीव्र विरोध केला होता.

 

या आंदोलनात १६,५०० लोकांचा बळी गेला असून सुमारे ३.३ लाख लोक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये तरुणांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. ह्यूमन राइट्स ॲक्टिव्हिस्ट न्यूज एजन्सी (HRANA) ३,०९० लोकांच्या मृत्यूची पुष्टी केली असून २२,००० पेक्षा जास्त लोकांना अटक करण्यात आले असल्याचे म्हटले आहे

 

खामेनेईंनी दिली हिंसाचाराची कबुली

याच वेळी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ली अली खामेनेई यांनी पहिल्यांदाच जगासमोर आंदोलनात हिंसाचार झाला असल्याचे आणि हजारोंचा बळी गेल्याचे मान्य केले आहे. परंतु या सर्व परिस्थितीसाठी खामेनेईंनी अमेरिकेला जबाबदार धरले आहे. खामेनेईंनी आंदोलकांना देशद्रोही आणि अमेरिकेचे फूट सोल्जर म्हटले आहे. त्यांच्या मते अमेरिका आणि इस्रायलने इराणमध्ये आपले एजंट्स पसरवुन आंदोलकांना भडकवले आहे.

 

व्हिडिओ येथे पहा !

 

गेल्या अनेक आठवड्यांपासून इराणमध्ये इंटरनेट बंद करण्यात आले होते. यामुळे तेथील परिस्थितीबाबत योग्य आणि अधिकृत माहिती मिळणे अत्यंत कठीण झाले होते. यावेळी देखील सोशल मीडियावर इराणमधील आंदोलनाचे भयावह व्हिडिओ पाहायला मिळालेले होते. मिळालेल्या माहितीनुसार, इराणच्या रस्त्यावर लोकांच्या मृतदेहांच्या बॅग्स पडलेल्या होत्या. अनेक जखमींनी उपचार आणि रक्तपुरवठाही नाकारण्यात आला होता. सध्या इराणमधील या परिस्थितीमुळे जागितक मानवाधिकार संघटनांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button