ताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्र

नागपुरात लिपिकांच्या वेतनत्रुटी साठी जय महाराष्ट्र संघटनेचा आक्रोश मोर्चा. राज्यातील हजारो लिपिकांचा सहभाग : कामबंद आंदोलनाचा इशारा


नागपुरात लिपिकांच्या वेतनत्रुटी साठी जय महाराष्ट्र संघटनेचा आक्रोश मोर्चा. राज्यातील हजारो लिपिकांचा सहभाग : कामबंद आंदोलनाचा इशारा.

 

नागपुरात लिपिकांच्या वेतनत्रुटी साठी जय महाराष्ट्र संघटनेचा आक्रो ।श मोर्चा.
राज्यातील हजारो लिपिकांचा सहभाग : कामबंद आंदोलनाचा इशारा.
(श्री अशोक डहाळे राज्याध्यक्ष)
जय महाराष्ट्र शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी संघटनेच्या आवाहनावरून लिपिकांच्या चौथ्या वेतन आयोगापासूनच्या वेतनातील त्रुटी दूर करून पदनाम बदलणे व जशास तशी जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी दिनांक 12 डिसेंबर 2025 रोजी नागपूर अधिवेशनात लिपिकांचा भव्य आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारोच्या संख्येने लिपिक कर्मचारी या मोर्चात सहभागी झाले होते. त्यामुळे नागपूरमधील यशवंत स्टेडियमवर प्रचंड जनसागर उसळल्याचे चित्र पहावयास मिळाले.

 

मोर्चात, ” लिपिकांच्या वेतनातील त्रुटी दूर करा , सुधारित वेतनश्रेणी लागू करा ” एनपीएस बंद करा, ओ पी एस लागू करा ” या घोषणांनी वातावरण दाणानून गेले. लिपिक वर्गाने शांततेत पण ठाम पद्धतीने सरकारपुढे आपली भूमिका मांडली.
चौथ्या वेतन आयोगापासून लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात तफावत निर्माण झालेली आहे. सदर वेतनतातील तफावत ही लिपिक वर्गावर अन्यायकारक असून वेतनातील झालेला अन्याय दूर करून सुधारित वेतनश्रेणीत लागू करावी व पदनामात बदल करावे तसेच 2005 नंतरच्या कर्मचाऱ्याना जुनी पेन्शन जशास तशी लागू करावी

मोर्चा स्थळी आमदार प्रवीण स्वामी,आमदार कैलास घाडगे पाटील यांच्यासह अन्य आमदार यांनी भेट देऊन लिपिकांच्या मागण्याबाबत आश्वासित केल्याप्रमाणे अधिवेशनात वेतनत्रुटी व पदनाम बदल करणे बाबत लक्षवेधी मांडली. लिपिक कर्मचाऱ्यांच्या या ऐतिहासिक उपस्थितीमुळे राजकीय वातावरण तापले असून आता राज्य शासन कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

लिपिकांच्या वेतनत्रुटी बाबत शासनाने लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा मोर्चातून लिपिक कर्मचारी वर्गाने व्यक्त केला या मोर्चात संघटनेचे राज्य अध्यक्ष अशोक डहाळे,राज्य कार्याध्यक्ष शरद बिरादार,सचिव आनंद भिसे, राज्य महिला संपर्कप्रमुख श्रीमती गोसावी मॅडम, राज्य महिला संघटक सुमन दाभाडे,राज्य प्रसिद्धी प्रमुख वंदना ठाकरे, बीड जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर आगळे, जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कुलकर्णी, जिल्हा कार्याध्यक्ष सोनुळकर तसेच बीड जिल्ह्यातील तालुका स्तरावरील सर्व पदाधिकारी व अधिकारी कर्मचारी हे उपस्थित होते.

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button