सैनिक पतीसोबत सासरवाडीकडे निघाली..रस्त्यातच महिलेचं जीवन संपलं! स्वप्नातही विचार केला नसेल…

भारतीय लष्करात कर्तव्य बजावणाऱ्या पतीसोबत सासरवाडीला निघालेल्या महिलेचं रस्त्यातच जीवन संपलं. पतीसोबतचा प्रवास हा शेवटचा ठरेल,असं स्वप्नातही या महिलेला वाटलं नसेल.
महिलेचं आयुष्य संपल्यानं तिचा पती आणि चिमुकला पोरका झाला. मन हेलावून टाकणारी ही घटना बुलढाण्यात घडली आहे. कोमल गवई (25)असं या मृत महिलेचं नाव आहे. पण या महिलेसोबत नेमकं काय घडलं? पतीसोबत तिचा प्रवास अखेरचा का ठरला? जाणून घ्या या थरारक घटनेबाबत..
त्या रस्त्यावर घडली सर्वात भयंकर घटना
मिळालेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्ग नेहमी कोणत्या ना कोणत्या घटनेमुळं चर्चेत असतो. आता जिल्ह्यातंर्गत,शहरातून आणि गाव खेड्याला जोडणारे रस्त्यांवरही वाहने सुसाट धावत असतात. परंतु, वेगावर नियंत्रण न ठेवल्याने भीषण अपघाततही घडतात. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा रस्त्यावर पश्चिमेस नागझरी नाल्याजवळही एक भयानक अपघात झाला. या अपघातात या महिलेचा जागीच मृत्यू झाला.पण या अपघातात महिलेचा पती प्रमोद सुरेश गवई (भारतीय सैनिक,25) आणि मुलगा सुदैवाने बचावले.
महिलेचा जागीच मृत्यू.. तर पती आणि मुलगा वाचला
राहेरी बुद्रुक येथील रहिवासी व सध्या भारतीय सैन्यातून रजेवर असलेले प्रमोद हे पत्नी कोमल आमि मुलासोबत बुलेट दुचाकीने सासरवाडीला निघाले होते.याचदरम्यान बैलगाडीचा दुचाकीचा धक्का लागल्याने त्यांची दुचाकी अचानक रस्त्यावर थांबली आणि त्याचवेळी समोरून येणाऱ्या ट्रकरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.
अपघात इतका भीषण होता की, महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर पती आणि मुलगा दोघेही वाचले.घटनेची माहिती मिळताच किनगाव राजा पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.पंचनामा करून मृतदेह पुढील तपासणीसाठी सिंदखेड राजा येथे पाठविण्यात आला आहे. ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु करण्यात आला आहे.











