Beed Video News : भयंकर अपघात; डिझेल टँकर जळून खाक;धक्कादायक Video व्हायरल

आगीच्या प्रचंड ज्वाला, धुराचे लोट अन्.’, मांजरसुंबा घाटात डिझेल टँकरचा भीषण स्फोट; धक्कादायक Video व्हायरल
बीड : सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी मांजरसुंबा घाटात एका भीषण अपघाताची घटना घडली. सोलापूरहून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने जाणाऱ्या डिझेल टँकरला पाठीमागून येणाऱ्या कंटेनरने जोरदार धडक दिली.
या धडकेमुळे डिझेलचा टँकर तात्काळ उलटला.त्यामुळे या टँकरला भीषण आग लागली.
टँकर डिझेलने भरलेला असल्यामुळे या आगीने काही क्षणातच भयंकर रौद्ररुप धारण केलं. या आगीमुळे महामार्गावरील दोन्ही लेनचे वाहतूक थांबवण्यात आली. त्यानंतर आग विझविण्याचे काम सुरू करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच मांजरसुंबा महामार्ग पोलीस आणि बीड ग्रामीण पोलीस आणि नेकनुर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
टँकरच्या भीषण अपघातामुळे महामार्गावर जवळपास दोन तास वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यानंतर एका बाजूने वाहतूक हळूहळू सुरळीत करण्यात आल्याचे पाहायला मिळालं. या अपघाताबाबत अद्याप प्रशासनाकडून कुठलीही घातपात झाली किंवा नाही याचा स्पष्टीकरण आलेलं नाही.
व्हिडिओ येथे पहा !
बीडच्या यंत्रणेतील गंभीर त्रुटी
आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तात्काळ बीड नगर पालिकेच्या अग्निशमन विभागाला कळविण्यात आलं होतं. मात्र, बीड पालिकेचा अग्निशमन बंब खराब असल्याची गंभीर बाब समोर आली. त्यामुळे वेळेवर मदत मिळू शकली नाही. त्यानंतर गेवराईहून अग्निशमन वाहन बोलावण्याची वेळ आली. यानंतर आग आटोक्यात आणण्याचे काम हाती घेण्यात आलं.
मोठा धोका टळला
टँकर उलटल्यानंतर त्यातील डिझेल उताराने कोळवाडी गावाकडे वाहत होते. या डिझेलसोबत आगही वाहत होती. त्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झालं होतं. गावापासून थोडे अंतरावरच डिझेलचा प्रवाह थांबला. त्यामुळे गावात आग पसरण्यासारखी मोठी दुर्घटना टळली.











