पोर्न स्टार बनायची इच्छा म्हणून पतीचं घृणास्पद कृत्य; पत्नीचा 13 मिनिटांचा Intimate व्हिडीओ केला Viral अन्…

मध्य प्रदेशातील रेवा जिल्ह्यात पती पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी भयानक घटना समोर आली आहे. पतीला पॉर्न स्टार बनण्याचं होतं म्हणून त्याने स्वत:च्या पत्नीचा खाजगी व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि एवढंच नाही तो सोशल मीडियावर अपलोड केला.
पतीच्या या घृणास्पद कृत्यानंतर पत्नीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. सध्या तो फरार असून पोलिसांना त्याचे लोकेशन मुंबईत मिळालं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला बऱ्याच काळापासून पोर्नोग्राफिक साईट्सचे व्यसन होतं हे तपासात समोर आलंय. पोर्नोग्राफिक साईट्सवर असलेले व्यक्ती हे त्याच्यासाठी आदर्श मानत होता. या वेडाने प्रेरित होऊन त्याने त्याच्या पत्नीसोबतचा 13 मिनिटं 14 सेकंदांचा खाजगी व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि नंतर तो जाणूनबुजून सोशल मीडियावर व्हायरल केला.
ही भयानक बाब पत्नीच्या लक्षात येताच तिने त्याला विरोध केला. त्यावर पती म्हणाले की, ‘मी व्हिडीओ जाणूनबुजून अपलोड केला आहे, मला कोणताही पश्चात्ताप नाही. मला लोकांनी ओळखावे असं वाटत होतं, मला लोकप्रिय व्हायचं होतं.’
हुंड्याच्या मागण्या पूर्ण…
पीडितेच्या भावाने सांगितलं की, या घृणास्पद कृत्यामागे हुंड्याची मागणी हे एक कारण होतं. या दोघांचं लग्न 10 मे रोजी झालं होतं. लग्नानंतर आरोपी सुरुवातीपासूनच आमच्यावर हुंड्यासाठी दबाव आणत होता. त्याने 3 लाख रुपयांची मागणी केली होती, ज्यापैकी 2 लाख रुपये त्याला आम्ही दिले. भावाच्या म्हणण्यानुसार, अपेक्षित रक्कम न मिळाल्याने संतापलेल्या पतीने खाजगी व्हिडीओ लीक करण्याचे घृणास्पद पाऊल उचललं असावं असा आरोप करण्यात आला आहे.
‘माझे आयुष्य उद्ध्वस्त…’
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पीडिता मानसिकदृष्ट्या खचली असून ती म्हणाली की, ‘त्याने हा व्हिडीओ नातेवाईक आणि मित्रांना पाठवला. त्यामुळे माझा सामाजात अपमान झाला असून त्याने मला कुठेही चेहरा दाखवण्याच्या लायक नाही ठेवलं. त्याने माझे आयुष्य उद्ध्वस्त केलंय…तो माणूस नाही, हैवान आहे.’
दरम्यान या प्रकरणात पोलीस तपास करत आहेत











