क्राईमताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्र

कलाकेंद्रातल्या डान्सरशी अनैतिक संबंध, बायकोचा फोन आला अन्.तरण्या पोराला मृत्यूनं गाठलं?


धाराशीव जिल्ह्यातील चोराखळी येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका 25 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन स्वत:ला संपवले आहे. मिळालेल्या माहितीनुसार तो धाराशीवमधील लोकनाट्य कला केंद्रातील एका नर्तकीच्या प्रेमात ठार वेडा झाला होता.

गेल्या पाच वर्षांपासून ते एकमेकांच्या प्रेमात होते. विशेष म्हणजे ते दोघेही अनेकवेळे फिरायलाही गेले होते. परंतु यावेळचे देवदर्शन 25 वर्षीय अश्रूबा कांबळे याच्यासाठी शेवटचे ठरले. कला केंद्रातील नर्तकीसोबत झालेल्या वादातून या तरुणाने रागाच्या भरात गळफास घेतला आहे. ही घटना समोर आल्यानंतर आता धाराशीव जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाच कसून तपास करत आहेत.

नेमकं काय घडलं?

धाराशीव येथे साई लोकनाट्य नावाचे एक कला केंद्र आहे. अश्रूबा कांबळे हा या कलाकेंद्रातील एका नर्तकीच्या प्रेमात होता. विशेष म्हणजे नर्तकीदेखील त्याच्यावर प्रेम करत होती. गेल्या पाच वर्षांपासून या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. विशेष म्हणजे अश्रूबा हा विवाहित होता. अश्रूबा आणि नर्तकी 8 डिसेंबर रोजी शिंगणापूर येथे देवदर्शनासाठी गेले होते. हेच देवदर्शन अश्रूबा याचे शेवटचे ठरले. त्याने नर्तकीशी वाद झाल्याने थेट गळफास घेत स्वत:ला संपवलं आहे.

बायकोचा फोन आला अन्…

अश्रूबा आणि नर्तकी दोघेही शिंगणापूर येथे देवदर्शनाला गेले होते. दोघांनही यथायोग्य देवदर्शन केले. परंतु परतत असताना अश्रूबा याला त्याच्या पत्नीचा फोन कॉल आला. त्यानंतर पत्नीचा फोन कॉल का आला? असा जाब विचारत नर्तकी अश्रूबाला भांडली. त्यानंतर दोघांमधील वाद चांगलाच वाढला. सुरुवातीला अश्रूबाने मी आत्महत्या करेन, अशी धमकी नर्तकीला दिली होती. पण नर्तकीने त्याकडे दुर्लक्ष केले. पुढे रागाच्या भरात अश्रूबा याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

दरम्यान, या प्रकरणी आरोपी नर्तिकेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. परंतु अनैतिक संबंधातून अश्रूबा कांबळे या तरुणाने स्वत:चे जीवन संपवल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button