मोठी बातमी! नगरपालिका, नगर परिषदांचा निकाल पुन्हा लांबणीवर, उद्या जाहीर होणार नाही

राज्यातील नगरपालिका, नगर परिषदेच्या निवडणुकीतल डावात मचाळा अजून थांबलेला नाही. नगरपालिका, नगर परिषदांचा निकाल उद्या लागणार होता. पण तो आता लांबणीवर पडला आहे.
त्यानुसार उद्या मतमोजणी होणार नाही आणि निकाल 21 डिसेंबर रोजी जाहीर होईल.
निवडणूक पारदर्शक राहिली पाहिजे यासाठी हा निर्णय देण्यात आला आहे. दरम्यान, काही नगरपरिषदांबाबत न्यायालयीन प्रक्रिया प्रलंबित असल्याने मतदानाच्या दोन दिवसापूर्वी राज्यातील 20 नगरपरिषदांची मतदान प्रक्रिया पुढे ढकलली होती. ही निवडणूक 20 डिसेंबरला होणार होती.
परंतु सर्व निवडणुकांचे निकाल एकाच दिवशी जाहीर झाले पाहिजे. अन्यथा उद्या लागणाऱ्या निकालामुळे पुढच्या निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो, अशी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती.
आज मतदान अन् निकाल थेट 21 डिसेंबरला
डिसेंबरला याबाबतचा युक्तिवाद ऐकल्यानंतर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचा निकाल एकाच दिवशी म्हणजे 21 डिसेंबरला जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार आज मतदान झाल्यानंतर त्याचे निकाल थेट 21 डिसेंबरला जाहीर होणार आहेत.
त्यानुसार, 20 डिसेंबरच्या निवडणुकीपर्यंत आचारसंहिता लागू राहील आणि कोणालाही एक्झिट पोल प्रसिद्ध करता येणार नसल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.











