महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी मतदान होण्याआधीच निकाल येण्यास सुरुवात झाली आहे. धुळे जिल्ह्यात ऐतिहासिक निकाल पहायला मिळाला आहे.
येथे नगराध्यक्ष पदासह सर्व 26 नगरसेवक विजयी झाले आहेत. मतदान न होताच हे सर्वजण विजयी झाले आहेत. यामुळे निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला आहे.
संपूर्ण राज्यात बिनविरोध निवडणुकीमुळे धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा नगरपालिका चच्रेत आली आहे. निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदा सह सर्व 26 जागांवरती भाजपाचे उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत. त्यांच्यासमोर निवडणूक लढायला उमेदवार नसल्याने त्यांची बिनविरोध निवड झालेली आहे. या बिनविरोध निवडीमुळे महान पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच हा विक्रम घडला आहे. या निकालामुळे राज्याचे पणन व राज्य शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांची राजकीय उंची वाढली आहे. त्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीमध्ये पणाला लागली होती. मात्र त्यांनी निर्विवाद यश मिळवत भाजपाचा झेंडा पालिकेवरती रोवल्यामुळे राज्यात पहिलं मोठं यश हे रावलांच्या माध्यमातून भाजपाला मिळालेला आहे.
दोंडाईचा नगरपालिकेमध्ये सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील दूरध्वनी द्वारे सर्व विजयी नगरसेवकांना शुभेच्छा दिल्या आहेत. दोंडाईच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितला आहे. तर दोंडाईचा नगरपालिकेची निवडणूक ही सर्व जाती धर्म व राजकीय पक्षांच्या सहकार्यामुळे बिनविरोध झाल्याचं मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले आहे.
दोंडाईचा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून शरयू भावसार यांनी अर्ज दाखल केला होता. मात्र मालमत्ता कर थकीत असल्यामुळे त्यांचा अर्ज बाद करण्यात आला. न्यायालयात जाणार असं सांगण्यात आलं होतं. मात्र अद्याप ते न्यायालयात त्यांनी दाद मागितले नाही त्यामुळे दोंडाईचा नगरपालिकेची निवडणूक एकतर्फी राहिली. जयकुमार रावल यांचे राजकीय वजन या निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे वाढलेला आहे. एकीकडे उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व म्हणून गिरीश महाजन यांच्याकडे पाहिले जात असताना जयकुमार रावल यांनी दाखवलेला करिष्मा हा त्यांचा पक्षातील राजकीय वजन वाढवणारा ठरणार आहे. त्यामुळे नगरपालिका आणि येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये जयकुमार रावल यांच्याकडे पक्ष मोठी जबाबदारी दिल असे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या शुभेच्छांच्या माध्यमातून दिसून येत आहे.
Back to top button