ताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचे
भारताचा पाकिस्तानला सर्वात मोठा धक्का, थेट हातावर तुरी, पाकची उडाली झोप, अँटी टँक क्षेपणास्त्रांसोबत…

काही दिवसांपासून भारत अमेरिकेतील संबंध तणावात आहेत. अमेरिकेने रशियाला रोखण्यासाठी चक्क भारतावर मोठा टॅरिफ लावला. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ अमेरिकेने लावला.
त्यामध्येच पाकिस्तान सतत भारत आणि अमेरिकेतील संबंध खराब करण्याचा प्रयत्न करत आहे. हेच नाही तर ऑपरेशन सिंदूरनंतर भारताविरोधात मुस्लिम देशांना भडकवण्याचे काम पाक करतोय. टॅरिफच्या मुद्द्यानंतर तणाव असतानाही भारत अमेरिकेत व्यापार चर्चा सुरू असून अंतिम टप्प्यात व्यापार करार असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वीच म्हटले. त्यामध्येच आता भारताने फक्त पाकिस्तानच नाही तर संपूर्ण जगाला मोठा धक्का देत अमेरिकेने भारतासाठी 93 दशलक्ष डॉलर्सच्या लष्करी पॅकेजला मंजुरी दिली आहे.
ज्यामुळे भारताला जेव्हलिन अँटी-टँक क्षेपणास्त्रे आणि एक्सकॅलिबर प्रिसिजन-गाइडेड तोफखाना राउंड्सची नवीन खरेदी करण्याची परवानगी मिळाली आहे. हे भारताचे मोठे यश असल्याचे बोलले जातंय. भारताला 100 FGM- 148 जेव्हलिन क्षेपणास्त्रे, 25 लाईट कमांड लाँच युनिट्स आणि 216 एक्सकॅलिबर तोफखाना राउंड मिळतील. यामुळे भारताची मोठी ताकद वाढणार हे स्पष्ट आहे.
ऑपरेशन सिंदूरदरम्यानच भारताने पाकिस्तानला सळो की पळो कडून सोडले होते. त्यामध्येच भारताची अजून ताकद वाढलीये. डीएससीएने म्हटले आहे की हे संरक्षण पॅकेज अमेरिका आणि भारत यांच्यातील धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करेल आणि पुढील धोक्यांना तोंड देण्याची भारताची क्षमता वाढवेल. हा खरोखरच अत्यंत मोठा करार दोन देशांमध्ये झाल्याचे बघायला मिळतंय.
काही दिवसांपूर्वी भारताने रशियासोबत देखील संरक्षण करार केला. अमेरिकेने सुमारे $47 दशलक्ष किमतीच्या एक्सकॅलिबर गाईडेड तोफखाना राउंड्सच्या विक्रीलाही मान्यता दिली आहे, ज्यामुळे एकूण किंमत अंदाजे $93 दशलक्ष झाली आहे. भारत आणि अमेरिकेतील करार पाहून पाकिस्तानच्या पायाखालची जमीन नक्कीच सरकली असणार आहे. भारताने रशियाकडून जवळपास तेल खरेदी बंद केली. आता अमेरिका भारतावरील अतिरिक्त टॅरिफ काढेल असे सांगितले जातंय. अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम भारतातील काही क्षेत्रांवर झाला असून अमेरिकेत होणार निर्यात कमी झालीये.











