ऑपरेशन सिंदूर थांबवा…’, काही तासांतच पाकिस्तानने भारतापुढं गुडघे टेकले …

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला भारताने अखेर १५ व्या दिवशी घेतला. पाकिस्तानमध्ये घुसून भारतीय सैन्याने दहशतवाद्यांचे ९ तळ नष्ट केले. या हल्ल्यात १०० पेक्षा अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने भारतापुढे अक्षरश: गुडघे टेकले. या हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचे महत्वाचे विधान समोर आले आहे. भारताने ऑपरेशन सिंदूर थांबवावे अशी विनंती त्यांनी केली आहे.
‘भारताने ऑपेशन सिंदूर थांबले तर आम्ही कोणतीही कारवाी करणार नाही.’, असे विधान संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी केले आहे. पाकिस्तानने भारताकडे ऑपरेश सिंदूर थांबवण्याची मागणी केली आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान चांगलाच घाबरला असून त्याच्या पायाखालची जमीन सरकली आहे. या हल्ल्यानंतर पाकिस्तानमधील शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आली. सध्या पाकिस्तानमध्ये दहशतीचे वातावरण आहे.
ख्वाजा आसिफ यांच्या या विधानावरून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की, पाकिस्तानने भारताची कारवाई स्वीकारली आहे. भारताने पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये एकूण ९ दहशतवाद्यांच्या तळावर एअर स्ट्राईकद्वारे हल्ला केला. भारताने या हल्ल्याचे वर्णन दहशतवादाविरुद्ध कारवाई करण्याचा आपला अधिकार असल्याचे म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय माध्यमांनीही भारताच्या या हल्ल्याचे अनेक फोटो प्रसिद्ध केले आहेत. भारताने केलेल्या या हल्ल्याला जगातील अनेक देशांनी पाठिंबा देखील दिला आहे.
दरम्यान, २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू झाला होता. ज्यामध्ये सामान्य नागरिक आणि पर्यटकांचा समावेश होता. त्यापैकी जम्मू-काश्मीरमधील स्थानिक तरुण सय्यद आदिल हुसेन शाह यांचाही समावेश होता ज्याने पर्यटकांना वाचवताना आपला जीव गमावला. या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देखरेखीखाली पार पडलेले हे ऑपरेशन देशासाठी न्यायाचे प्रतीक आणि हल्ल्यात मृत्यू झालेल्यांना खरी श्रद्धांजली मानले जात आहे.











