मुंबईदर्शन करताना या ठिकाणी चुकून जाऊ नका?;भुताडकी असलेल्या जागा, यात आहे एक प्रसिद्ध ठिकाण…

मुंबई 24 तास जागं राहणारं शहर, स्वप्नांचे शहर. जिथे जवळपास सगळेच आपली स्वप्ने पूर्ण करायला येतात. मुंबईतच स्थायिक होतात. काहीजण मुंबईत आपलं भविष्य घडवायला येतात तर काहीजण फक्त जीवाची मुंबई करायला म्हणजे मुंबईदर्शन करायला.
कारण काहींनी मुंबई ही फक्त चित्रपटांमध्येच पाहिली आहे किंवा पुस्तकांमध्ये. त्यामुळे तिच्याबद्दल जाणून घेण्याची, मुंबईतील प्रसिद्ध स्थळ पाहण्याची उत्सुकता असते. त्यासाठी हजारो लोक मुंबईत येत असतात. त्यानुसार प्रत्येकाचे मुंबईचे अनुभवही वेगळे असतात.
मुंबईत भुताडकी असलेल्या जागा
मुंबईत जशा मनाला आनंद देणाऱ्या जागा असतात तसेच भीती वाटणाऱ्या जागा देखील आहेत. होय मुंबईत अशा काही हॉन्टेड जागा आहेत ज्यांच्याबद्दल जाणून कोणालाही धक्का बसेल. जर तुम्हीही मुंबई दर्शन करण्याचा विचार करत असाल तर या ठिकाणांपासून जरा लांबच राहा. मुंबईततशा बऱ्याच भुताडकी असलेल्या, लोकांनी त्यांचे अनुभव सांगितलेल्या अशा जागा आहेत त्यापैकी काही जागांबद्दल जाणून घेऊयात.
या जागा प्रसिद्ध आहेत
डिसूजा चाळ, महिम
महिममधील डिसूजा चाळ मुंबईतील सर्वात ‘हॉन्टेड’ ठिकाणांपैकी एक मानली जाते. अनेक वर्षांपूर्वी विहिरीत पडून मृत्यू झालेल्या एका महिलेची आत्मा आजही त्या चाळीत भटकत असल्याचं स्थानिक सांगतात. रात्रीच्या वेळी चाळीत पावलांचे आवाज येतात, बोलण्याचा भास आणि सावल्या दिसल्याच्या घटना इथे वारंवार घडतात. अनेक नागरिकांनी त्याबद्दलचे किस्से सांगितले आहेत.
मुकेश मिल, कुलाबा
मुंबईतील सर्वात लोकप्रिय हॉन्टेड स्पॉट मानली जाणारी मुकेश मिल. अनेक फिल्मी गाणी आणि सीन इथे शूट झालेत, पण कलाकार आणि तंत्रज्ञांनी येथे अनुभवलेले प्रसंग अनेकदा सांगितले आहेत. अचानक कॅमेऱ्यामध्ये बिघाड होमे, सेटवर कोणी नसताना आवाज, आणि सावल्या दिसणे असे बरेच अनुभव तेथे आले आहेत. त्यामुळे सायंकाळीनंतर येथे शूटिंगसाठी जवळपास बंदीच घालण्यात आली आहे.
IC कॉलनी, बोरिवली
बोरिवलीतील IC कॉलनी परिसर शांत आहे. पण एका विशिष्ट रस्त्याची लोकांना भीती वाटते. रात्री उशिरा येथे एक पांढऱ्या साडीतील स्त्री रस्त्यावर उभी दिसते, तर काहींना रिकाम्या रस्त्यावर कोणीतरी पळत असल्याचे भास होतात.
SNDT गर्ल्स कॉलेज, जुहू
कॉलेज परिसर रात्री अंधारात फारच भयानक दिसतो असं तिथल्या लोकांचे म्हणणे आहेय. काही विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार इथल्या एका जुन्या इमारतीतून रात्री विचित्र हसण्याचे आणि कुजबुजण्याचे आवाज येतात. सेक्यूरिटी गार्डदेखील रात्री काही भागात एकटे फिरत नाहीत.
मुंबई हाई कोर्ट
या भव्य इमारतीच्या कॉरिडॉरमध्ये एका जुन्या वकिलाची आत्मा फिरते असं सांगितलं जातं. अनेक कर्मचाऱ्यांनी रिकाम्या कोर्टरूममध्ये पानं उलटण्याचा आवाज ऐकला असल्याचं सांगितलंय.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून कोणत्याही प्रकारच्या दावा यामध्ये करण्यात आलेला नाही त्यासाठी संमधीत तज्ज्ञांचा सल्ला घ्या.











