वादळी पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा

राज्यात उन्हाच्या चटक्याने होरपळ होत असतानाच, वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. ३) विदर्भात काही ठिकाणी वादळी पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) आहे.
उर्वरित राज्यात वादळी पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (येलो अलर्ट) कायम असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
नैर्ऋत्य मध्य प्रदेश आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत आहेत. कोकणपासून लक्षद्वीपपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरील बाष्पयुक्त वाऱ्यांचा संगम होत असल्याने राज्यात वादळी पावसाने हजेरी लावली आहे. सातारा जिल्ह्यातील कराड येथे ५० मिलिमीटर, खटाव येथे ३० मिलिमीटर, पाटण, पेडगाव येथे १० मिलिमीटर, सांगलीतील पलूस २० मिलिमीटर आणि कोल्हापूर येथील राधानगरी येथे १० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
बुधवारी (ता. २) सकाळपर्यंतच्या २४ तासांत ब्रह्मपुरी येथे उच्चांकी ४०.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सोलापूर, चंद्रपूर येथे ४० अंशांपेक्षा अधिक तापमानाची, जेऊर, यवतमाळ येथे ३९ अंश, तर निफाड, धुळे, परभणी (कृषी), धाराशिव येथे ३८ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. उन्हाचा चटका काहीसा कमी झाला असला तरी उकाडा त्रासदायक ठरत आहे.
आज (ता. ३) विदर्भातील चंद्रपूर, अकोला, अमरावती जिल्ह्यांत वादळी पाऊस गारपिटीची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि उर्वरित विदर्भात वादळी पावसाच्या अंदाजामुळे दक्षतेचा इशारा (येलो अलर्ट) आहे. उर्वरित राज्यात कमाल तापमानातील वाढीसह तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
बुधवारी (ता. २) सकाळी ८.३० पर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :
ठिकाणे—तापमान कमाल—तापमान किमान
पुणे—३५.४—२३.२
अहिल्यानगर—३७.०—२३.४
धुळे—३८.०—१७.०
जळगाव—३७.०—२४.०
जेऊर—३९.५—२०.५
कोल्हापूर—३६.७—२४.०
महाबळेश्वर—२८.४—१६.६
मालेगाव—३५.२—निरंक
नाशिक—३३.४—२२.३
निफाड—३८.७—१८.३
सांगली—३६.४—२३.३
सातारा—३७.६—२०.६
सोलापूर—४०.१—२५.६
सांताक्रूझ—३७.७—२५.८
डहाणू—३२.१—२३.७
रत्नागिरी—३२.७—२६.०
छत्रपती संभाजीनगर—३५.८—२५.६
धाराशिव—३८.०—२३.७
परभणी—निरंक—२५.०
परभणी (कृषी)—३८.८—२५.२
अकोला—३६.४—२१.६
अमरावती—३३.६—१९.३
भंडारा—३६.०—२२.०
बुलडाणा—३४.२—२२.६
ब्रह्मपुरी—४०.२—२३.१
चंद्रपूर—४०.०—निरंक
गडचिरोली—३७.०—२१.०
गोंदिया—३४.९—२१.८
नागपूर—३४.४—२१.१
वर्धा—३६.१—१९.८
वाशीम—३६.४—निरंक
यवतमाळ—३९.०—२०.४
सरासरी तापमान (अंश से.)
विभाग—किमान—कमाल
विदर्भ—१९.८—४०.२
मराठवाडा—२३.७—३८.८
पश्चिम महाराष्ट्र—१६.६—४०.१
उत्तर महाराष्ट्र—१७.०—३८.८
कोकण—२३.७—३७.७
वादळी पाऊस, गारपिटीचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :
चंद्रपूर, अकोला, अमरावती.
वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव, लातूर, बुलढाणा, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली.
३९ अंशांपेक्षा अधिक तापमान असलेली ठिकाणे :
ब्रह्मपुरी ४०.२, सोलापूर ४०.१, चंद्रपूर ४०, जेऊर ३९.५, यवतमाळ ३९.