अक्कलकोट तालुक्यात दमदार पाऊस,लोकांच्या घरात पाणी, बोरगाव-वागदरी या रस्त्याचा संपर्क तुटला
![](https://lokshahinews24.com/wp-content/uploads/2022/08/Screenshot_20220804_084622-1-1.jpg)
सोलापूर (Solapur) जिल्ह्यात काही ठिकाणी चांगला पाऊस झाला आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे.
त्यामुळं नागरिकांच्या घरात देखील पाणी शिरल्याच्या घटना घडल्या आहेत. अक्कलकोट (Akkalkot) तालुक्यात बोर गावात तुफान पाऊस झाला आहे. त्यामुळं बोर गावातील अनेक लोकांच्या घरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं आहे. नाले, ओढे दुथडी भरुन वाहत असल्यानं बोरगाव-वागदरी या रस्त्याचा संपर्क देखील तुटला आहे. त्यामुळं वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
अक्कलकोट तालुक्यात दमदार पावसानं हजेरी लावली. या मुसळधार पावसामुळं बोर गावच्या आसपासच्या अनेक ओढ्यांना पूर आला असून, जनजीवन विस्कळीत झालं आहे. अक्कलकोट तालुक्यातील बोरगाव, घोळसगाव, किणीवाडी, काझी कणबस बादोले यासह आदी गावात पावसानं थैमान घातलं आहे. शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. घोळसगाव येथील तलाव 100 टक्के भरला असून ओव्हरफ्लो झाला आहे. बोरगाव येथील पीर राजेबागसवार साठवण तलाव देखील 100 टक्के भरला असून बोरगावचा ओढा दुथडी भरुन वाहत आहे.