ताज्या बातम्या

गडचिरोली पोलीसांची माेठी कामगिरी, ४० लाखांच्या ३०० मोबाईलचा शोध


गडचिरोली पोलीसांना सन २०२२ मधे जवळपास २२ लाख किंमतीचे एकुण १५० आणि सन २०२३ मध्ये जवळपास १८ लाखाहून अधिक किमतीचे एकुण १३५ हरवलेले मोबाईल शोधुन काढण्यात यश आले.बहुतांश माेबाईलधारकांना त्यांचे माेबाईल फाेन नुकतेच पाेलीसांनी परत केले.मानवी जीवनातील सर्वात महत्त्वाचा घटक बनलेल्या मोबाईल चोरीचे व हरविल्याच्या दररोज देशभरात लाखो तक्रारी येतात. अनेकदा चोरी गेलेला मोबाईल सापडत देखील नाही. मात्र, गडचिरोली पोलिसांनी मागील दोन वर्षांत तब्बल ४० लाख किमतीचे फाेन शाेधत जवळपास तीनशे मोबाईल नागरिकांना परत केले.सोमवारी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात यावर्षी शोधण्यात आलेले मोबाईल संबंधित नागरिकांना प्रदान करण्यात आले. हरवलेले किंवा चोरी गेलेले मोबाईल शोधण्यात मागील दोन वर्षांत गडचिरोली पोलिसांचा आलेख वाढता असून २०२२ मध्ये २२ लाख किमतीचे १५० तर २०२३ मध्ये आत्तापर्यंत १८ लाख किमतीचे १३५ मोबाईल शोधण्यात त्यांना यश आले आहे.त्यामुळे एकदा हरवलेला मोबाईल सापडत नाही, ही भावना मनातून काढून टाकत तत्काळ तक्रार केल्यास मोबाईल परत मिळू शकतो, असे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी यावेळी सांगितले. सोबतच सायबर गुन्हेगारांपासून जनतेने सावध राहावे असेही आवाहन निलोत्पल यांनी केले आहे.




Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button