नॅन्सी पेलोसी तैवानमध्ये दाखल होताच चीन भडकला
अमेरिकन संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी त्यांचा तैवान दौरा आटोपून दक्षिण कोरियाला रवाना झाल्या आहेत.
पेलोसी मंगळवारी रात्री उशिरा तैवानला पोहोचल्या होत्या. पेलोसी तैवानमध्ये दाखल होताच चीन (China) भडकला आणि तैवानवर अनेक निर्बंध लादले.
एवढेच नाही तर चीनच्या लष्कराने तैवानच्या हवाई हद्दीत नैऋत्य भागात २१ लष्करी विमाने उडवून आपली ताकद दाखवून दिली. चीन हा तैवानला आपल्याच देशाचा भाग मानतो, तर तैवान हा स्वतःला स्वातंत्र्य देश मानतो. यामुळे अमेरिकन (USA) संसदेच्या अध्यक्षांनी तैवानचा दौरा करणे हे चीनला खटकले असून चीनने याचा विरोध करत तैवानवर अनेक निर्बंध लादले.
हा दौरा होऊ नये म्हणून चीनने अनेक धमक्या दिल्या होत्या, मात्र चीनचा विरोध जुगारून पेलोसी यांनी तैवान दौऱ्यावर पाठवले होते. हा दौरा आटपल्यानंतर पेलोसी या दक्षिण कोरियाला रवाना झाल्या आहेत.