क्राईम

वॉर्डबॉयने नर्सला खोलीत डांबलं; डॉक्टरने हातपाय बांधून रुग्णालयातच केला अत्याचार


उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये एका खासगी रुग्णालयातील नर्सवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. हॉस्पिटलमधील डॉक्टरने एका नर्सला बांधून तिच्यावर बलात्कार केला. या घटनेत रुग्णालयातील दोन वॉर्डबॉयचाही देखील समावेश आहे. पोलिसांनी पीडितेची वैद्यकीय तपासणी केली आहे. पीडितेच्या वडिलांच्या तक्रारीवरून आरोपी डॉक्टरला अटक करण्यात आली आहे आणि दोन्ही वॉर्डबॉयना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.
या संमधीचे व्रत्त एका वेबसाईने प्रकाशीत केले आहे.



पीडित मुलीच्या वडिलांनी दिलारी पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची 20 वर्षांची मुलगी गेल्या 10 महिन्यांपासून ठाकूरद्वारा-काशीपूर रोडवरील एका खासगी रुग्णालयात नर्स म्हणून काम करते. शनिवारी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास ती ड्युटीसाठी घरून रुग्णालयात गेली होती. त्यानंतर एका नर्सने तिला सांगितलं की, डॉ. शाहनवाझने तिला बोलण्यासाठी आपल्या खोलीत बोलावलं आहे.

पीडितेच्या वडिलांनी सांगितलं की, मुलीने संबंधित डॉक्टरांच्या खोलीत जाण्यास नकार दिला. यानंतर रुग्णालयातील वॉर्डबॉय जुनैद आणि मेहनाज यांनी तिला जबरदस्तीने डॉ. शाहनवाझच्या खोलीत नेलं आणि खोलीला बाहेरून कुलूप लावलं. रात्री 12 वाजण्याच्या सुमारास डॉक्टरने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. डॉक्टरने पीडितेला जातीवाचक शब्द वापरून जीवे मारण्याची धमकी देखील दिली.

पीडितेच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी डॉक्टरला अटक केली आहे. दोन्ही आरोपी वॉर्डबॉयना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे. पोलिसांनी पीडितेची शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली आणि तिचा जबाब नोंदवला.

याप्रकरणी पोलीस अधिकारी राजेश कुमार यांनी सांगितलं की, पीडितेच्या वडिलांच्या तक्रारीवरून दिलारी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन आरोपी डॉक्टरला तत्काळ अटक करण्यात आली आहे. पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. याशिवाय रुग्णालयात तैनात असलेल्या दोन कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button