Crime News : 2 वेळा एकाच नवरदेवासोबत लग्न; 13 दिवसांनंतर नवरीने केलं असं की पती शॉक…

2 वेळा एकाच नवरदेवासोबत लग्न; 13 दिवसांनंतर नवरीने केलं असं की पती शॉक…
Crime News : लखनऊ – लग्नाला अवघे १३ दिवस झाले होते. रात्रीच्या जेवणानंतर नवरदेव झोपण्यासाठी बेडरूममध्ये गेला. तिथे तो पत्नीची वाट पाहत होता. बराच वेळ पत्नी बेडरूममध्ये न आल्याने त्याने तिचा शोध सुरू केला.
पण ती कुठेच सापडली नाही. रात्रीचे 11 वाजले होते. नवरदेवाने बाकीच्या कुटुंबीयांना विचारलं असता त्यांनाही वधू कुठे आहे हे माहीत नव्हतं. सर्वजण नव्या नवरीचा शोध घेऊ लागले. अनेकवेळा तिच्या मोबाईलवर कॉलही केला. पण उत्तर मिळालं नाही.
वधूचे सर्व दागिने आणि घरातील रोख रक्कमही गायब असल्याचं वराला आणि त्याच्या कुटुंबीयांना समजलं. त्यांना संशय आल्याने त्यांनी तिच्या आई-वडिलांच्या घरी फोन केला. पण वधू तिथेही नव्हती. त्यानंतर कुठूनतरी नववधू प्रियकरासह पळून गेल्याचं समोर आलं. वराने लगेच जवळचं पोलीस ठाणे गाठलं. वधू आणि तिच्या प्रियकरावर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तात्काळ वधूचा शोध सुरू केला. वराने सांगितलं, की वधूचा प्रियकर तिच्याच गावचा आहे.
पोलीस तात्काळ वधूच्या आईच्या घरी पोहोचले. येथे कुटुंबीयांनी सांगितलं की, त्यांची मुलगी कुठे आहे याची त्यांनाही माहिती नाही. त्यानंतर पोलिसांनी तिच्या प्रियकराच्या घरीही छापा टाकला. तिथे प्रियकरही सापडला नाही. याचा अर्थ नववधू प्रियकरासह पळून गेल्याचं काही प्रमाणात स्पष्ट झालं. त्यांचे दोन्ही मोबाईल बंद आहेत. अशा स्थितीत दोघेही सध्या कुठे आहेत हे सांगता येत नाही. पोलीस त्यांचा शोध घेण्यात व्यस्त आहेत.
प्रकरण अमेठीच्या शिवरतगंजमधील तिलोई गावातील आहे. पीडितेच्या पतीने सांगितलं – फेब्रुवारी 2024 मध्ये एका सामूहिक विवाह कार्यक्रमात शेजारच्या गावातील मुलीशी माझं लग्न झालं होतं. नंतर दोन्ही कुटुंबांनी मिळून 11 जुलै रोजी मंदिरात आमचा विवाह लावून दिला. लग्न जमवताना वधूने मला सांगितलं नाही की तिचा प्रियकर आहे. नाहीतर हे लग्न मी स्वतः केलं नसतं. 11 जुलै रोजी मी तिला माझ्या घरी घेऊन आलो. सर्व काही व्यवस्थित चाललं होतं. मात्र 24 जुलै रोजी वधू अचानक घरातून गायब झाली. आम्हाला कळलं की तिचा एक बॉयफ्रेंड आहे. ती त्याच्यासोबत पळाली आहे. तिने घरातून दागिने आणि पैसेही नेले आहेत.