व्हिडिओ न्युज

एक चूक अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; एका व्यक्तीबरोबर लिफ्टमध्ये भयंकर घडलं, व्हायरल Video


आजकाल ई-बाईकचा ट्रेंड वाढताना दिसतोय; पण काही दिवसांपासून ई-बाईकच्या बॅटरीच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. ई वाहने आणि त्यांच्या बॅटरीमध्ये होणारे स्फोट ही देशात चिंतेची बाब ठरले आहे.



या बॅटरीचा कधी स्फोट होईल, ते सांगता येत नाही. खासकरून दुचाकीमध्ये असे प्रकार खूप जास्त प्रमाणात होत होते. सोशल मीडियावरही तुम्हाला ई-बाईकचा अचानक स्फोट झाल्याचे व्हिडीओ पाहायला मिळतात. पण, आता ई-बाईकच्या बॅटरीसंदर्भात असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे; जो पाहून तुम्हालाही धक्का बसेल. या व्हिडीओमध्ये एका ई-बाईकच्या बॅटरीचा स्फोट झाल्याचे दिसतेय. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीच्या छोट्याशा चुकीमुळे मोठा अपघात झाल्याचे स्पष्ट होतेय.

इलेक्ट्रिक वाहनांमध्ये बॅटरीला आग लागल्याच्या बातम्या व व्हिडीओ आपण पाहतो आणि ऐकतो. अशाच एका घटनेचा व्हिडीओ नुकताच पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सध्याच्या काळात लोक इलेक्ट्रिक वाहनांकडे आकर्षित होत आहेत. परंतु, इलेक्ट्रिक वाहनांमध्ये एकच समस्या आहे आणि ती म्हणजे त्यांच्या बॅटरी चार्ज करणे. इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरी चार्ज करण्यासाठी तुम्हाला सहजासहजी जागा मिळत नाही. इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरी घेऊन जाताना विशेष खबरदारी घ्यावी लागेल. कारण- अशा प्रकारच्या बॅटरीचा स्फोट होण्याचा धोका असतो. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये अशीच एक दुर्घटना पाहायला मिळत आहे.

एक व्यक्ती इलेक्ट्रिक बाईकची बॅटरी घेऊन लिफ्टमध्ये प्रवेश करते आणि लिफ्टचा दरवाजा बंद होतो. लिफ्टचे दार बंद होताच, बॅटरीचा अचानक स्फोट होतो आणि लिफ्टमध्ये आग लागते. लिफ्ट बंद असल्याने त्या व्यक्तीला बाहेरही पडता येत नाही. त्यावेळी लिफ्टमधून जाण्यासाठी दोन लोक लिफ्टची वाट पाहत होते. गेट उघडताच प्रकार पाहून दोघेही घाबरले. एक व्यक्ती बचाव पथकाला बोलावते. काही वेळानंतर जेव्हा बचाव पथक येते आणि लिफ्टचा दरवाजा उघडून त्या व्यक्तीला बाहेर काढते. व्यक्तीचे संपूर्ण शरीर काळे झालेले दिसते. व्यक्ती आगीत पूर्णत: जळाल्याचे दिसून येते. हा भीतीदायक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

येथे पाहा व्हिडीओ

 

कमेंट्समधून खबरदारीचा पुनरुच्चार

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर @JasmeenIndian नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत ४,९०,००० हून अधिक वेळा पाहिला गेला आहे. त्यावर लोकांकडून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. यावर टिप्पणी करताना, एका वापरकर्त्याने लिहिले, ‘इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक वस्तू हाताळताना आपण सर्व आवश्यक खबरदारी घेतली पाहिजे.’ आणखी एका युजरने, ‘हे ​​खूपच भयानक आहे’, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

 

(लोकशाही न्युज24 हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट ईतर माहिती यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लोकशाही न्युज24 कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लोकशाही न्युज24 यांची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लोकशाही न्युज24 स्वीकारत नाही.)

 

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button