दहशतवादी हल्ला,अमेरिकेवर झालेल्या 9/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा न पाहिलेला VIDEO व्हायरल
America ( अमेरिका ) : अमेरिकेतल्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर 11 सप्टेंबर 2001 रोजी भयानक दहशतवादी हल्ला झाला होता. त्याला 23 वर्षं झाल्यानंतर त्याचा एक न पाहिलेला व्हिडिओ आता प्रकाशात आला आहे. तो खूपच भयानक असून, विमान धडकल्यापासून पूर्ण बिल्डिंग जमीनदोस्त होईपर्यंतचा सगळा घटनाक्रम त्या व्हिडिओत चित्रित झालेला आहे.
🔥🚨BREAKING NEWS: New footage of 9/11 has surfaced 23 years after the attack. This footage was uploaded by Kei Sugimoto, this video shows angles of the collapse of The Wold Trade Center that have never been seen before.
The angles shown in this video haven’t been seen before… pic.twitter.com/DtkHzQFT1u
— Dom Lucre | Breaker of Narratives (@dom_lucre) July 25, 2024
अगदी दगडाचं काळीज असलेल्या व्यक्तीचाही हा व्हिडिओ पाहून थरकाप उडू शकतो.
26 जुलै रोजी भारतात कारगिल विजय दिवस साजरा केला जात आहे. भारत-पाकिस्तान युद्धाला 25 वर्षं पूर्ण झाल्याच्या दिवशी अमेरिकेवरच्या 9/11 दहशतवादी हल्ल्याचा न पाहिलेला व्हिडिओ प्रकाशात आला आहे.अमेरिकेतल्या न्यूयॉर्कमधल्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या या दहशतवादी हल्ल्याचा हा व्हिडिओ प्रचंड थरकाप उडवणारा आहे. अल कैदा या दहशतवादी संघटनेने हा हल्ला केला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे, ‘पत्रिका’ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर अल कैदाच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला, तेव्हा न्यूयॉर्कच्या पूर्व किनाऱ्याकडच्या विमानतळांवरून कॅलिफोर्नियाकडे जाण्यासाठी प्रवास करत असलेल्या चार कमर्शियल विमानांचं उड्डाण करत असतानाच अपहरण करण्यात आलं होतं. त्यानंतर अल कैदाशी संबंधित असलेल्या 19 इस्लामी दहशतवाद्यांनी या चारही विमानांच्या साह्याने मोठा दहशतवादी हल्ला केला होता.
अमेरिकन एअरलाइन्सची फ्लाइट 11 आणि युनायटेड एअरलाइन्सची फ्लाइट 175 या विमानांनी वर्ल्ड ट्रेड सेंटरला जाणूनबुजून धडक मारण्यात आली. त्यामुळे वर्ल्ड ट्रेड सेंटरचे उत्तर आणि दक्षिणेकडचे टॉवर उद्ध्वस्त झाले.
अमेरिकन एअरलाइन्सच्या फ्लाइट 77मधले 184 प्रवासी मारले गेले. ती फ्लाइट व्हर्जिनियातल्या आर्लिंग्टन काउंटीत पेंटागॉनवर कोसळली होती. युनायटेड एअरलाइन्सचं फ्लाइट 93 हे विमान पेनसिल्व्हानियाच्या समरसेट काउंटीच्या एका मैदानात कोसळलं होतं. त्यात विमानातल्या सर्व 40 प्रवाशांसह पायलटच्या टीममधल्या सर्वांचा मृत्यू झाला होता.
ट्विन टॉवर्सवरच्या या हल्ल्यामुळे केवळ अमेरिकाच नव्हे, तर सारं जगच हादरलं होतं. नंतर अमेरिकेने या हल्ल्याचा मास्टर माइंड असलेल्या ओसामा बिन लादेनचा खात्मा करून या हल्ल्याचा बदला घेतला होता.