क्राईम

Wardha Crime : भयंकर ! दगडाने ठेचून डोक्याचा केला चेंदामेंदा


Crime News : वर्धा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत दिवसा ढवळ्या भररस्त्यात एका तरूणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे.



तरूणाला भररस्त्यात दगडाने ठेचून त्याची हत्या करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, आरोपी तरूणाची हत्या करत असताना लोकांनी बघ्याची भूमिका बजावली होती. या घटनेने आता वर्ध्यात हळहळ व्यक्त होतं आहे. (wardha crime news drunk youth killed boy through Stoned to death crime news wardha)

वर्धा जिल्ह्यातील देवळी शहरात ही धक्कादायक घटना घडली आहे. मृत तरूण देवळी शहरात आपले काम आटपून आपल्या गावी निघाला होता. रस्त्यात तो रिक्षाची वाट पाहत असताना एक तरूण अचानक त्याच्या जवळ आला. या तरूणाने त्याच्याकडे पैसै मागायला सुरुवात केली. मात्र पैसै देण्यास नकार देताच संतापलेल्या तरूणाने मारहाण करण्यात सुरुवात केली. या मारहाणीनंतर आरोपीने दगडाने ठेचून पीडीत तरूणाची हत्या केली.

संपूर्ण घटनाक्रम याच रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या एका तरूणाच्या मोबईलमध्ये कैद झाला आहे. यामध्ये आरोपी तरूण अगदी बिनधास्तपणे पीडीत तरूणाला मारहाण करत आहे. दगडाने ठेचून त्याची हत्या करत आहे. विशेष म्हणजे आजूबाजूला अनेक लोक ही घटना पाहत होते. कुणीही तरूणाच्या बचावासाठी गेले नाही. मात्र काहींनी संबंधित घटनेची माहिती पोलिसांना तत्काळ दिली होती. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपीला अटक केली.

 

आरोपी तरूण हा दारूच्या नशेत होता. या नशेतून त्याने तरूणाची हत्या केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी तरूणाला अटक केली आहे. तसेच या प्रकरणाचा अधिक तपास देवळी पोलीस करीत आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button