जनरल नॉलेजमहत्वाचेमहाराष्ट्रराजकीय

राज ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार? काय आहेत कारणे?


राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर सिएम पदाच्या रेसमधील एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचं नेमकं काय होणार?



मनसेन किती वेळा भूमिका बदलल्या… आणि किती वेळा पलटी खाल्ली… हा वेगळ्या संशोधनाचा विषय… पण लोकसभेला नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाकडे बघत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी विधानसभेला मात्र नाद पूरा करायचाच… असा जणू निर्धार केलाय… मनसे येणाऱ्या विधानसभेला 200 ते 250 जागा स्वबळावर लढवेल, असं जाहीर करून पक्षानं महायुती आणि महाविकास आघाडीचीही धाकधूक वाढवलीये… 2006 साली पक्ष स्थापन झाल्यापासून 2009 ची इलेक्शन वगळता मनसेचे इंजिन गारच राहिलं… सततच्या बदलत जाणाऱ्या भूमिका यामुळे पक्षाला मोठा फटका बसला… याचाच परिणाम म्हणून की काय 2019 च्या विधानअवघा एकच आमदार निवडून आला… मराठी अस्मिता, टोल नाका, भोंगा ते बिनशर्त पाठिंबा… हा सततच्या भूमिका बदलण्याचा काळ मागे पडल्यानंतर राज ठाकरेंना आता राजकारण कळू लागलय, हे कन्फर्मपणे सांगता येऊ शकतं… त्याचं कारण म्हणजे मनसेनं घेतलेला एक महत्त्वाचा निर्णय… राज ठाकरेंचा हा निर्णय महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ घालू शकतो… राज साहेबांना मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसवण्याचं जे मनसैनिकांचं कित्येक वर्षांचं स्वप्न आहे, ते ह्या एका निर्णयामुळे पूर्ण होऊ शकतं… राज ठाकरे यांना यंदाच्या विधानसभेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याचे कसे फुल चान्सेस आहेत?

 

राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर सिएम पदाच्या रेसमधील एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचं नेमकं काय होणार? त्याचंच हे इन डेप्थ एनालिसिस…

राज ठाकरे मुख्यमंत्री पदावर बसण्याचे चान्सेस वाढलेत असं म्हणण्याचं पहिलं कारण सांगता येईल ते म्हणजे महायुतीचं गंडलेलं राजकारण

शिवसेना फुटली.. शिंदेंनी आमदार, खासदार पळवून भाजपसोबत सत्ता स्थापन केली.. अगदी याच क्षणापासून मनसेचा सूर आणि नूर बदलला… मनसेची भाजप आणि शिंदेंसोबत जवळीक वाढली… अनेक महत्वाच्या मुद्यावर सरकारचे कान उपटण्याचा कार्यक्रम पत्र लिहून राज ठाकरेंनी चालवला…दुसरीकडे शिंदे आणि अजितदादांना सोबत घेतल्यानं फायदा व्हायचा सोडून गणित भाजपवरच उलटलं…शिंदेंनी केलेल्या बंडखोरीचा आणि अजितदादांच्या पक्ष चोरीचा प्रकार जनतेला काही पटला नाही…त्यामुळे या दोघांचीही इमेज जनतेच्या मनातून ढासळली… आणि या सगळ्याचे करता करविता फडणवीस असल्यामुळे त्यांच्याबद्दल जनतेच्या मनात बरीच चिड दिसली… या सगळ्याचं प्रतिबिंब लोकसभेच्या निकालात उमटलं…आणि महायुतीच्या कुठल्याच पक्षाला खासदारकीचा दोन अंकी आकडा ओलांडता आला नाही…

लोकसभेचा हा घाव ताजा असताना आता विधानसभा जड जाणार, हे तिन्ही पक्षांना कळून चुकलय…शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री बनवावं, तर त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट जाऊन शिवसैनिक नाराज होतील…अजितदादांना मुख्यमंत्री बनवावं तर बारामतीतून पडलेली सीट, तरीही दिलेली राज्यसभा…आणि वरून पुन्हा मुख्यमंत्रीपद दिलं तर दादा भाजपला जड जातील…राहता राहिला प्रश्न तो भाजपचा…तर महाराष्ट्रातील बिघडलेलं वातावरण पाहता आणि फडणवीस वगळता दुसरा कुठलाही तोडीस तोड नेता पक्षाकडे नाहीये…या सगळ्याचा विचार करता फोडाफोडीचा… आणि सहानुभूतीचा…हा सगळा इफेक्ट महाराष्ट्राच्या राजकारणातून घालवायचा असेल तर महायुतीकडे एक पर्याय उरतो तो म्हणजे राज ठाकरे…

200 ते 250 जागांवर विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय मनसेनं नुकताच बोलून दाखवलाय…याचाच अर्थ राज ठाकरे विधानसभा स्वबळावर लढतील…पण असं असलं तरी मनसेनं तब्बल अडीचशे जागा लढवण्याचं सोडलेलं हे पिल्लू मुळात मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठीच असण्याची शक्यता दाट आहे… राज ठाकरे हे येतात ठाकरे कुटुंबातून… त्यामुळे जर त्यांना महायुतीनं मुख्यमंत्रीपद दिलं तर ठाकरे विरुद्ध शिंदे या लढतीत शिंदे जसे कमजोर दिसतात… तसं न होता थेट ठाकरे विरुद्ध ठाकरे अशी लढत होऊन उद्धव ठाकरेंच्या बाजूने असणार सहानुभूतीचं वारही कमी होईल…दुसरं म्हणजे शिंदे आणि अजितदादा हे सत्तेतील नेते आहेत…यांच्याकडे मातब्बर नेत्यांचा भरणा आहे…त्यामुळे त्यांना जवळ केलं तर भाजपला विविध खाते वाटपात आणि प्रत्यक्ष सरकार चालवताना आत्ता येतायत तशा बऱ्याच अडचणी येऊ शकतात…यापेक्षा राज ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवून भाजप सरकारवर डॉमिनन्स ठेवू शकतो…

राज ठाकरे मुख्यमंत्री होऊ शकतात असंच स्ट्रॉंगपणे सांगता येतं त्याचं पुढचं कारण म्हणजे अजितदादा आणि शिंदे यांचं डावललेलं नेतृत्व…

महायुतीमध्ये सध्या मुख्यमंत्री पदाचे तीन प्रमुख दावेदार आहेत…त्यांची नाव अर्थात आपल्याला माहित आहेच… पण यात शिंदेंच्या शिवसेनेला आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीला जनतेने सपशेल नाकारल्याचं दिसतय…त्यात शिंदे आणि अजितदादा यांना सोबत घेतल्यामुळे भाजपाचाही लोकसभेला मोठा लॉस झाल्याचं आपण पाहिलं आहेच… त्यामुळे शिंदेंच्या आणि अजितदादांच्या बंडखोरीचं ओझं फेकून द्यायचं असेल तर भाजपला स्वबळावर लढावं लागेल…आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये त्यांना मदत होईल ती राज ठाकरेंची…शिंदेंना आणि अजित दादांना साईडलाईन करून भाजप मनसे सोबत बस्तान बंधू शकतं… त्यात ठाकरे कुटुंबातील चेहऱ्याला मुख्यमंत्री पदाची ऑफर देऊन भाजपा आपली डागळलेली इमेज पुन्हा सुधारू शकतं… पक्ष फोडीचा लागलेला टॅग पुसण्यासाठी भाजपाला महाराष्ट्रात काहीतरी नवीन समीकरण जुळवाव लागेल… या सगळ्यात भाजपची आणि मनसेची वाढलेली जवळीक पाहता हे समीकरण लवकरच जन्माला येईल, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही…

त्यामुळे महायुतीतील झालेल्या गोंधळात राज ठाकरेंना मुख्यमंत्री बनण्याचा फुल टू स्कोप आहे… पण आता भाजपने असा प्रस्ताव राज ठाकरेंकडे सरकवला तर ते यावर काय स्टॅन्ड घेतील? यावर पुढची गणित अवलंबून असणार आहेत…बाकी तुम्हाला काय वाटतं? येणाऱ्या विधानसभेत राज ठाकरे मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर दिसू शकतील का?


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button