बहिणीसोबत मुलाला ‘त्या’ अवस्थेत पाहून भाऊ संतापला, वडिलांना फोन केला अन्…
नवी मुंबई येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. वडिलांनी आणि भावानेच मुलीच्या प्रियकराची हत्या केली आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी 24 वर्षीय भावाला आणि वडिलांना (वय ४५) अटक केली आहे.
नवी मुंबई टाउनशिप येथे ही घटना घडली आहे. रविवारी दुपारी ही घटना उघडकीस आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी तरुणीने तिच्या प्रियकराला पनवेल येथील देवाचा पाडा येथे घरी बोलवले होते. त्याचवेळी तरुणीचा भाऊदेखील घरी आला होता. सुरुवातीला त्याचे दरवाजा वाजवला मात्र तरुणीने काहीच प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर त्याने जबरदस्ती दरवाजा उघडून आत गेला तेव्हा त्याच्या लक्षात आले की बहिण आणि तिचा प्रियकर आतमध्ये आहेत. तेव्हा आरोपीने त्यांच्या वडिलांना फोन केला.
बहिणीसोबत प्रियकराला पाहून तिच्या भावाचा राग अनावर झाला त्यानंतर भाऊ आण वडिलांनी तिच्या प्रियकराला मारहाण करण्यास सुरुवात केली. मात्र, वडिल व भावाने केलेल्या जबर मारहाणीत 18 वर्षीय प्रियकराचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांना या घटनेबाबत सूचना मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर लगेचच तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवला. शवविच्छेदनाचे अहवाल मात्र, अद्याप आलेले नाहीयेत.
मुलीच्या भावाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून भाऊ आणि वडील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आले. दोघांविरोधात भारतीय दंडसहिता 302 आणि 34 या अंतर्गंत गुन्हा दाखल झाला आहे. तळोजा पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. मात्र, या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.