क्राईम

महिलेच्या खूनाच्या आरोपात सासरकडचे तुरुंगात; पण 14 वर्षानी ती अचानक आली दारात


सहसा मृत्यू झालेले लोक परत आल्याचं आपल्याला फक्त चित्रपटांमध्येच पाहायला मिळतं. पण जेव्हा अशी घटना प्रत्यक्षात घडते तेव्हा प्रत्येकाच्या पायाखालची जमीन सरकते आणि मन ते स्वीकारायला तयार होत नाही.



 

पण समोर ती व्यक्ती उभी असते, तेव्हा सर्वजण हे सत्य मानतात. असंच एक प्रकरण आता समोर आलं आहे. यात ज्या महिलेचे संपूर्ण सासरचे लोक तिच्या हत्येच्या आरोपाखाली तुरुंगात होते, ती तब्बल 14 वर्षांनंतर परत आली. तिच्या हत्येच्या आरोपात पोलिसांनी तिचे सासू, सासरे आणि पतीला आरोपी केलं आणि शिक्षेची मागणी केली होती.

 

तिन्ही आरोपींना शिक्षा मिळणार असल्याचं जवळपास निश्चित झालं होतं. पण 14 वर्षांनंतर बबिता नावाची महिला तिच्या सासरच्या घरी परतली. ही एखाद्या चित्रपटाची कथा नसून पूर्व चंपारणच्या पताही ब्लॉकच्या सरैया गोपालमधील खरी घटना आहे. शिबहर येथील शिवचंद्र राम यांनी 2001 मध्ये त्यांची मुलगी बबिता हिचा विवाह बिजय राम सोबत मोठ्या धूमधडाक्यात केला होता. 2010 मध्ये बबिता काहीतरी कारणाने घरातून पळून गेली आणि मुलीच्या कुटुंबीयांनी 2010 मध्ये पोलीस ठाण्यात खून आणि मृतदेह बेपत्ता केल्याचा गुन्हा दाखल केला.

 

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केल्यावर सतत तपासाच्या नावाखाली ते कधी दिल्ली तर कधी नेपाळला गेले. यानंतर रामप्रसाद राम, त्याचा मुलगा आणि पत्नी यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली. पोलिसांनी तपासाच्या नावाखाली भरपूर पैसे घेतल्याचे पीडितांनी सांगितलं. पोलिसांनी निरपराधांचे आरोपपत्रही तयार केलं. सुमारे 6-7 महिने शिक्षा भोगल्यानंतर कुटुंबाला आर्थिक, मानसिक आणि सामाजिक त्रास सहन करावा लागला आणि अखेर देवाने पीडित रामप्रसाद रामची कैफियत ऐकली. 14 वर्षानंतर बेपत्ता महिला बबिता कुमारी अखेर घरी परत आली.

 

महिलेचा शोध लागल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून महिलेचा न्यायालयात जबाब नोंदवला आणि तिच्या सासरकडच्यांना न्याय मिळू शकला. या हत्याकांडात कुटुंब तुरुंगात गेलं होतं, ते महिला परत आल्यानंतर मुक्त झालं. महिलेला आता सासरच्यांसोबत राहायचं आहे. पण सगळं संपलं आहे. कारण सासरच्या मंडळींना आता या महिलेला सोबत ठेवायचं नाही, जिने त्यांचं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त केलं आहे.

 

रामप्रसाद राम हे रेशनचं दुकान चालवतात आणि आपल्यावर लादलेल्या आरोपांमुळे ते सतत चिंतेत असायचे. आपल्या समाजातील लोकांमध्ये जायलाही लाजायचे. त्याचवेळी बेपत्ता महिला बबिता हिचा पती विजय राम यानेही दुसरं लग्न केलं असून तोही पत्नीला ठेवण्यास तयार नाही. बबिताने घरातून पळून जाऊन मोठा गुन्हा केल्याचं त्याचं मत आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button