शिवसेना नेत्याच्या मुलाचं काळं कृत्य, सार्वजनिक शौचालयात १६ वर्षीय मुलीवर बलात्कार …

मुंबईतील पॉश एरिया असणाऱ्या वांद्रे मध्ये बलात्काराची भयानक घटना घडली आहे. सार्वजनिक सौचालयात १६ वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.
सार्वजनिक शौचालयात काळं कांड करणारा आरोपी हा ठाकरेंच्या शिवसेना पक्षाचा स्थानिक राजकीय नेत्याचा मुलगा आहे. मुलीवर अत्याचार करणारा नराधम आरोप हा वांद्रे येथील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या स्थानिक नेत्याच्या मुलगा असून त्याचे वय २० वर्षे इतके आहे.
पीडित मुलीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ या प्रकरणाची गंभीर दखल घेत गुन्हा दाखल केला आहे. निर्मल नगर पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. पोलिसांनी आरोपी मुलाला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहे. लैंगिक अत्याचार आणि पीडितेला जीवाची धमकी दिल्याप्रकरणात २० वर्षाच्या मुलाविरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.
मिळालेल्या माहितीनुसार, वांद्रे पूर्व परिसरातील एका सार्वजनिक शौचालयात १६ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली शिवसेना (ठाकरे गट) च्या स्थानिक नेत्याच्या मुलाला अटक करण्यात आली. निर्मल नगर पोलिसांनी १ ऑक्टोबर रोजी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी चौकशी करून त्याला माझगाव येथील सिटी सिव्हिल अँड सेशन्स कोर्टात हजर केले. कोर्टाने आरोपीला ६ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ वर्षाच्या मुलीवर १ ऑक्टोबर रोजी आरोपीने बलात्कार केला. आरोपीने पीडितेला वांद्रे पूर्व येथील सार्वजनिक पुरुष शौचालयात नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. बलात्कार केल्यानंतर आरोपीने तिला जीवे मारण्याची धमकी दिली. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करत तपास सुरू आहे.











