मोठी बातमी ! आज लागणार दहावी परीक्षेचा निकाल, पहा निकाल
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर. 27 मे रोजी दुपारी 1 वाजता निकाल जाहीर होणार. शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर ऑनलाइन पद्धतीने हा निकाल विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे.
महामंडळामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल सोमवारी ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे. याआधी बारावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर दहावीच्या परीक्षेचा निकाल कधी जाहीर होईल याची उत्सुकता विद्यार्थ्यांना होती. मार्च महिन्यात ही परीक्षा घेण्यात आली होती. त्यानंतर आज शिक्षण मंडळाने या परीक्षांच्या निकालाची तारीख जाहीर केली.
राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या विभागीय मंडळांनी मार्च महिन्यात दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली होती. आता निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. मंडळाने नोंदी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल सोमवारी दि. २७/०५/२०२४ रोजी दुपारी १ वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे. बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर निकाल विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे.
येथे पहाल निकाल !👇👇
दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल https://mahresult.nic.in या वेबसाइटवर दुपारी एक वाजल्यानंतर पाहता येईल. तसेच विद्यार्थ्यांना निकालाची प्रिंट आऊटही घेता येईल. दहावीच्या Digilocker app मध्ये डिजिटल गुणपत्रिका उपलब्ध (Digital Marksheet) करून देण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. वेबसाइटवर गेल्यानंतर महाराष्ट्र SSC निकाल 2024 च्या लिंकवर क्लिक करा. येथे रोल नंबर टाकून सबमिट करा. यानंतर स्क्रिनवर निकाल दिसेल अशी माहिती मंडळाकडून देण्यात आली.
https://mahresult.nic.in या वेबसाइटव विद्यार्थ्यांच्या निकालाबाबतची अन्य माहिती उपलब्ध होईल. तसेच https://mahahsscboard.in या वेबसाइटवर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होणार आहे. राज्यातील नऊ विभागीय मंडळांतीलजवळपास १६ लाख ९ हजार ४४४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. विशेष म्हणजे यंदा राज्यातील बहुतांश परीक्षा केंद्रांवर परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पडल्या होत्या.