पुणेमहाराष्ट्रराजकीयव्हिडिओ न्युज

कमळाचं चिन्हच दिसेना,Video मतदानाला गेले; पण कमळाचं चिन्हच दिसेना, पुण्याच्या धायरीतील आजोबा संतापले


पुणे : पुणे जिल्ह्यात तिसऱ्या टप्प्यात बारामती लोकसभा मतदासंघासाठी आज मतदान होत आहे. बारामती लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या आणि पुणे शहराशी संलग्न असलेल्या भागातील नागरिकांनी सकाळपासूनत मतदान केंद्रावर जात मतदान करायला सुरुवात केली त्यावेळी न्युज18 लोकमत ने यासंमधीचे व्रत प्रकाशीत केले आहे

मात्र, महायुती आणि महाविकासआघाडीतील असलेल्या वेगवेगळ्या पक्षांमुळे मतदारांचा गोंधल होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

अशाच एका आजोबांचा एक व्हिडिओ आता समोर आला आहे. या काकांना बहुतेक भाजपला मतदान करायचं होतं. मात्र, Evm वर कमळाचं फुलं दिसत नसल्याने आजोबा संतापले. पुण्यातील धायरीच्या काका चव्हाण शाळेतील मतदानादरम्यान घडलेल्या या प्रकाराचा व्हिडिओ आता समोर आला आहे.

बारामतीत यावेळी महायुती आणि महाविकासआघाडी अशी लढत आहे. महायुतीचा उमेदवार यावेळी राष्ट्रवादीच्या सुनेञा पवार असून त्या घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवत आहे. तर, महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे निवडणूक लढवत आहे. मात्र, महायुतीच्या सुनेत्रा पवार यांचं चिन्हं घड्याळ असल्याने आजोबांना इथे भाजपचं चिन्हच दिसलं नाही. यामुळे आजोबा संतापले.

घड्याळ चिन्हामुळे तिथं यावेळी कमळ हे चिन्ह दिसत नव्हतं. त्यामुळे भाजपच्या पारंपरिक मतदारांचा हा असा संताप झाल्याचं बघायला मिळतंय. बारामती मतदारसंघाकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं आहे. महाविकास आघाडीकडून पुन्हा एकदा खासदार सुप्रिया सुळे या लोकसभेच्या रिंगणात आहेत. तर महायुतीकडून सुनेत्रा पवार यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. या मतदारसंघात नणंद विरोधात भावजयी असा सामना आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button