व्हिडिओ न्युज

Video: ‘मी बेशरम आहे’; मेट्रोत बसायला जागा न मिळाल्याने तरुणाच्या चक्क मांडीवर जाऊन बसली महिला


दिल्ली मेट्रो वादाचं, गोंधळाचं केंद्र ठरत आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण, दिल्ली मेट्रोसंदर्भात दररोज काहीही विचित्र ऐकायला मिळतं. कधी जागा मिळण्यासाठी भांडण होतं, कंटेन्ट क्रिएटर्स रिल्स बनवतात तर कधी एखाद्याच्या आक्षेपार्ह कृतीसाठी दिल्ली मेट्रो चर्चेत येते.

सध्या दिल्ली मेट्रोमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

(Woman Forcibly Sits on Man Lap Inside Delhi Metro viral video)

व्हिडिओमध्ये दिसतंय की, एक महिला मेट्रोमध्ये जागा मिळत नसल्याने चक्क एका व्यक्तीच्या मांडीवर जाऊन बसते. व्हिडिओ कधीचा आहे हे समजू शकलं नाही पण सध्या हा व्हिडिओ चर्चेत आहे. मेट्रोमध्ये गर्दी होती, यावेळी काळा मास्क घातलेली महिला जागेसाठी प्रवाशांशी भांडते. जेव्हा तिला कोणीही जागा देत नाही तेव्हा ती एका तरुणाला जागा देण्यास सांगते. त्याने नकार दिल्याने महिला चक्क त्याच्या मांडीवरच जाऊन बसते.

महिला तरुणाच्या मांडीवर जाऊन बसल्यानंतर म्हणते, ‘मला काय, आम्हीपण बेशरम होऊ’ यादरम्यान बाजूच्या जागेवर बसलेला व्यक्तीला नाईलाजाने त्याच्या जागेवरुन उठावे लागते. महिला म्हणते की, ‘मला फरक पडत नाही. तुम्हाला फरक पडत असेल. तेही आता नाही रात्री फरक पडत असेल.’ महिला असंही म्हणते की, ती नेहमी नियमांचे पालन करते. ‘मी नियम का मोडू?’

 

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी महिलेवर संताप व्यक्त करत आहेत. महिलेची वागणूक योग्य नसून तिला अटक करण्याची यावी अशी मागणी होत आहे. एका नेटकऱ्याने म्हटलं की, ;म्हणून आपल्याला लिंग-समानता हवी आहे. पोलिसांनी देखील असाच दृष्टीकोन ठेवणे आवश्यक आहे.’ एका नेटकऱ्याने म्हटलं की, ‘अनेक पुरुष महिलांना बसायला जागा देतात. पण, यांचं आता अती होत आहे.’


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button