ताज्या बातम्यामहाराष्ट्र

सोलापूरच्या ‘ऑपरेशन परिवर्तन’चा पंतप्रधान पुरस्काराने गौरव


सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील ऑपरेशन परिवर्तन उपक्रमाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सध्याचे पोलीस अधीक्षक सरदेशपांडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
सोलापूर जिल्ह्याच्या तत्काल‍ीन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वात ‘ऑपरेशन परिवर्तन’ वर्ष 2021-22 मध्ये राबविण्यात आले होते. त्यांच्या या कामाची दखल घेत नागरी सेवा दिनी उपक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सन्मानित केले गेले. जिल्ह्यामध्ये अवैध दारू व्यवसायास आळा घालण्याकरीता, त्याचे समूळ उच्चाटनासाठी सोलापूर ग्रामीण पोलीस दलाने नावीन्यपूर्ण पद्धतीचा उपक्रम राबविला होता. त्यांच्या या उपक्रमास पोल‍ीस यंत्रणेचे सहकार्य आणि स्थानिकांची साथ यामुळे त्यांचे आयुष्य पालटले.



त्यांच्या या कार्याची दखल घेत प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार सोलापूरचे सध्याचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे स्वीकारला आहे. सोलापूर पोलिसांनी राबवलेल्या सामाजिक उपक्रम ॲापरेशन परिवर्तनसाठी सेवादिनाचा पंतप्रधानांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. तत्कालीन एसपी तेजस्वी सातपुते यांनी राबवलेल्या ॲापरेशन परिवर्तनला केंद्र सरकारचा विशेष पुरस्कार मिळालाय.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button