हा फोटो काढल्यानंतर फोटोग्राफरने केली आत्महत्या, अंगावर काटा आणणारी कहाणी नेमक घडल काय?
अशा काही गोष्टी आहेत, ज्या आपण शब्दात मांडू शकत नाही तर त्याबदल्यात एक फोटो किंवा व्हिडीओ बरंच काही सांगून जातो. असाच एक फोटो खूप आधी वृत्तपत्रात शेअर करण्यात आला. पण त्यानंतर या फोटोच्या फोटोग्राफरने आत्महत्या केली.
ज्यानंतर हा फोटो आणखीच लोकांच्या नजरेत आला, ज्याची जगभर चर्चा झाली.
आता हे ऐकल्यानंतर या फोटोबद्दल जाणून घेण्याची नक्कीच तुम्हाला इच्छा झाली असेल. चला या मिस्टेरियस फोटोबद्दल आणखी थोडं जाणून घेऊ.
प्रसिद्ध फोटोग्राफर केविन कार्टरने 1993 मध्ये सुदानमध्ये एक फोटो काढला होता. दक्षिण आफ्रिकेत राहणाऱ्या केविन या तरुण छायाचित्रकाराने आपल्या आयुष्यात अशी अनेक छायाचित्रे काढली आहेत ज्यांची इतिहासात नोंद झाली आहे.
अशाच एका फोटोमुळे त्याचे नाव जगातील महान फोटोग्राफरमध्ये सामील झाले. या फोटोने त्याला अनेक पुरस्कार मिळवून दिले, पण हा फोटो वादाचाही भाग ठरला. हा फोटो काढल्यानंतर केविन इतका नैराश्यात गेला की त्याने आत्महत्याही केली.
खरे तर हा फोटो सुदानचा आहे. ज्यामध्ये एक मुलगी भुकेने खाली पडते, तिच्या मागे एक गिधाड लपले होते. हा फोटो पाहून असे मानले जात होते की तिच्या मागे बसलेले गिधाड मुलीच्या मृत्यूची वाट पाहत होते, जेणेकरून ती मरताच तो तिला खाऊ शकेल.
हा फोटो काढल्यानंतर काही वेळाने त्या फोटोग्राफरला कळलं की ती मुलगी नसून मुलगा होता. ज्याचे नाव काँग न्योंग आहे. या प्रसिद्ध फोटोला ‘द व्हल्चर अँड द लिटल गर्ल’ असे नाव देण्यात आले.
हा फोटो 26 मार्च 1996 रोजी प्रसिद्ध वृत्तपत्र न्यूयॉर्क टाईम्सच्या लेखासोबत प्रकाशित करण्यात आला होता. हे पाहून लोक इतके अस्वस्थ झाले की त्यांनी ती मुलगी वाचली की नाही हे जाणून घेण्यासाठी वृत्तपत्र कार्यालयात फोन केला. तसेच हा फोटो पाहिल्यानंतर लोकांनी केविनवर बरीच टीकाही केली. लोक तिथे उपस्थित असलेल्या केविनला दुसरे गिधाड म्हणू लागले. हे ऐकून केविनला धक्का बसला.
या फोटोमुळे आफ्रिकेत पसरलेली भूक संपूर्ण जगासमोर आली. हा फोटो काढणाऱ्या केविनला जगप्रसिद्ध पुलित्झर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या काळात दक्षिण आफ्रिकेत हिंसाचार झाला. जो केविन त्याचा मित्र केन ओस्टरब्रोकसोबत कव्हर करण्यासाठी गेला होता, ज्यामध्ये केनचा मृत्यू झाला.
सुदानमध्ये काढलेल्या या वादग्रस्त फोटोवर टीका होत असतानाच, आपल्या मित्राच्या मृत्यूच्या बातमीने केविन पूर्णपणे उद्ध्वस्त झाला होता. त्यानंतर 27 जुलै 1994 रोजी त्यांनी दक्षिण आफ्रिकेतील एका नदीच्या काठावर आपली कार पार्क केली, कारच्या एक्झॉस्ट पाईपला दुसरा पाईप जोडला आणि त्यातून बाहेर पडणारा विषारी कार्बन मोनोऑक्साइड वायू तोंडात घेतला.
त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. यावेळी केविनने सुसाईड नोटही टाकली होती. दुसरीकडे, सुदानमध्ये केविनने ज्या मुलाचा फोटो काढला होता, तो मुलगा उपासमारीने मरण पावला नसून तो जिवंत असल्याचेही समोर आले आहे. ज्याचा 2008 साली तापामुळे मृत्यू झाला होता.