ताज्या बातम्यादेश-विदेश

“भारतासोबत पुन्हा व्यापार सुरु करा”, पाकिस्तानात होऊ लागली मागणी


पाकिस्तान सध्या गंभीर अशा आर्थिक संकटाचा सामना करत आहे. पाकिस्तानच्या खस्ता आर्थिक हालाखीच्या पाश्वभूमीवर आता भारताशी पुन्हा व्यापारी संबंध प्रस्थापित करण्याची मागणी होऊ लागली आहे.

भारत-पाकिस्तान यांच्यातील व्यापार मागील काही वर्षांपासून बंद आहे. अलीकडेच, पाकिस्तानमध्ये स्थापन झालेल्या नव्या सरकारने भारतासोबतचा व्यापार पुन्हा सुरु करण्याचे संकेत दिले आहेत.

तथापि, दोन्ही देशातील संबंध केव्हा सामान्य होतील किंवा व्यापारी संबंध पुन्हा नव्याने प्रस्थापित होतील याबद्दल अद्याप स्पष्टता नाही. पाकिस्तानने 2019 मध्ये भारतासोबतचे द्विपक्षीय संबंध संपुष्टात आणले होते. मात्र आता, पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी भारतासोबत व्यापार पुन्हा सुरु केला जाऊ शकतो, असे संकेत दिले आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, शनिवारी ते म्हणाले की, ‘पाकिस्तानी उद्योगपतींना भारतासोबत व्यापार करायचा आहे… सरकार सर्व संबंधितांशी बोलून याबाबतच्या शक्यतांचा धांडोळा घेईल.’ विशेष म्हणजे, पाकिस्तानमध्ये (Pakistan) भारतासोबत व्यापार पुन्हा सुरु करण्याची चर्चा अशा वेळी सुरु झाली आहे, जेव्हा पाकिस्तान आर्थिक संकटाचा सामना करत आहे. भारतासोबतचे संबंध सामान्य करण्याआधी अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न करण्याचे संकेत दार यांनी दिले आहेत.

दोन्ही देशातील व्यापार का थांबला?

दरम्यान, ऑगस्ट 2019 मध्ये भारत सरकारने कलम 370 रद्द केले. तेव्हापासून पाकिस्तानने भारतासोबतचे द्विपक्षीय संबंध संपुष्टात आणले होते. मात्र, पाकिस्तानच्या आयातीवर भारताने लादलेला 200 टक्के टॅरिप हे एक कारण असल्याचे सांगितले जाते. यापूर्वी, भारताने पाकिस्तानचा मोस्ट फेवर्ड नेशन किंवा MFN दर्जा रद्द केला होता. 14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने (India) हे पाऊल उचलले होते. या घटनेत पाकिस्तानी दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्याला लक्ष्य केले होते. या दहशतवादी घटनेत 40 जवान शहीद झाले होते. घटनेच्या अवघ्या 24 तासांनंतर भारताने पाकिस्तानचा MFN दर्जा काढून घेतला होता.

काय कारणे असू शकतात?

दुसरीकडे, दोन्ही देशातील व्यापार पुन्हा नव्याने सुरु करण्याबाबत DAR कडून स्पष्टपणे काहीही सांगितलेले नाही. मात्र, पाकिस्तानच्या बदलत्या भूमिकेमागे अनेक कारणे आहेत. याकारणांपैकी पहिले कारण- पाकिस्तानचे नवे सरकार नव्या धोरणाची शक्यता दर्शवत आहे. दुसरे कारण- पाकिस्तानची आर्थिक स्थिती देखील असू शकते. भारतासोबतचा व्यापार थांबल्यामुळे पाकिस्तानला दूरच्या देशांतून माल आयात करावा लागतो, त्यामुळे आधीच कमी असलेला परकीय चलनाचा साठा आणखी कमी होत आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button