करवंद रानमेवा,करवंद खाणं फायदेशीर,करवंद खाण्याचे फायदे
उन्हाळा आला की अनेक फळांची आठवण येते. यात महत्वाचे आणि सगळ्यांना आवडणारे फळ म्हणजे आंबा. तसेच गावी गेल्यावर गावच्या अनेक फळांची आपल्याला आठवण येते आणि यातील एक महत्वाचे फळ म्हणजे रानातली करवंद.
करवंद हे असं फळ आहे ज्यामुळे शरीराला अनेक पोषण तत्वे मिळतात. करवंद हा रानमेवा डोंगराळ भागात सहज मिळतो. करवंद खाणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते.
करवंद खाण्याचे फायदे
करवंदामध्ये ‘सी’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते त्यामुळे त्वचाचे विकार करवंदाच्या सेवनाने दूर होतात.
करवंद हा रानमेवा आहे, तो नैसर्गिकरित्या उपलब्ध असल्यामुळे याच्या सेवनाने दुष्परिणाम होत नाही.
रक्ताच्या कमतरतेमुळे अशक्तपणा जाणवत असेल तर रोज मूठभर करवंदे खावीत. याने रक्ताची कमतरता नक्कीच भरून येईल.
करवंदामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्तीदेखील वाढते.करवंदामध्ये मोठ्या प्रमाणात सायट्रिक अॅसिड असल्यामुळे उष्णतेमुळे होणार त्रास करवंदाच्या सेवनाने कमी होतात.
उन्हाचा त्रास मोठ्याप्रमाणात होत असेल तर शरीराचा दाह कमी करण्यासाठी करवंदाचे सरबत करून प्यावे.
मळमळ, उलटी असे त्रास होत असल्यास करवंदे अत्यंत गुणकारी आहेत.
करवंदाची पाने ही देखील औषधी गुणधर्माने युक्त आहेत.
करवंदाची पाने मधामध्ये बारीक करून खाल्ल्यास कोरडा खोकला नाहीसा होतो.
करवंदामध्ये कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असते.