ताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्रराजकीय

निकालाआधीच रवींद्र धनगेकर यांचे लागले अभिनंदनाचे पोस्टर; पोस्टरवर मजकूर..


कसब्यातून मविआचे रवींद्र धनगेकर हे उमेदवार आहेत, पण धनगेकर यांच्या कार्यकर्त्यांनी निकालाआधीच विजयाचे तसेच अभिनंदन.करणारे पोस्टर लावले आहे. हे पोस्टर कसब्यात लावले नसून, वडगाव येथे लावण्यात आले आहेत, पण अनाधिकृत पोस्टर लावल्यामुळं पालिकेनं पोस्टर हटवले आहे. पण निकालाआधीच विजयी झाल्यामुळं अभिनंदन असे पोस्टर लावल्यामुळं आश्चर्य व्य़क्त करण्यात येतंय.



 

पुणे : (आशोक कुंभार )पुण्यात भाजप आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कसबा पेठ (Kasba Peth) तर चिंचवडमध्ये भाजपा दिवगंत आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या जागी पोटनिवडणुकीसाठी (26 रविवारी, फेबुवारी) मतदान झाले. दरम्यान, कसब्यातून मुक्ता टिळक यांच्या नातेवाईकांना उमेदवारी न देता, भाजपाने हेमंत रासने यांना उमेदवारी दिल्याने नाराजी समोर आली होती. रासने यांच्याविरुद्ध काँग्रेसचे रवींद्र धनगेकर हे उमेदवार आहेत. त्यामुळं य़ेथे कॉंटे की टक्कर होणार आहे. याचा निकाल दोन मार्चला लागणार आहे. पण त्यापूर्वीच कसब्यातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे.

पोस्टरबाजी काय म्हटलंय पोस्टरवर?

कसब्यात भाजपाने हेमंत रासने हे उमेदवार आहेत, तर काँग्रेसचे धनगेकर यांच्यात अत्यंत चुरशीचा सामना होणार आहे, तसेच दोघांनाही जिंकण्याची पन्नास-पन्नास टक्के संधी असल्याचं राजकीय विश्लेषकांनी म्हटलं आहे. पण निकालाआधीच धनगेकर यांचे विजयाचे पोस्टर लावण्यात आल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. हे काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोस्टर लावले असून, ” आपल्या हक्काचा माणूस, रवींद्रभाऊ धनगेकर आमदारपदी निवड झाल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन” असा मजकूर पोस्टरवर लिहिण्यात आला आहे. तसेच धनगेकरांचा मोठा फोटो यावर लावण्यात आला आहे. पण पोस्टर अनाधिकृत असल्यानं पालिकेनं हे पोस्टर हटवले आहे.

कशी आहे मतांची टक्केवारी?

 

कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत अनुक्रमे 50.06 टक्के आणि 50.47 टक्के मतदान झाले. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत दोन्ही मतदारसंघांमध्ये मतदानाचा टक्का घसरल्याने निकाल काय लागणार, याबाबत उत्सुकता असणार आहे. येत्या गुरुवारी 2 मार्चला मतमोजणी होणार आहे. कसब्यात सन 2019 च्या निवडणुकीत 51.54 टक्के, तर चिंचवडमध्ये 55.88 टक्के मतदान झाले होते. पोटनिवडणूक असल्याने मतदार मोठ्या संख्येने बाहेर पडणार नाहीत ही भीती खरी ठरली. कसब्यात गेल्या विधानसभा निवडणुकीपेक्षा सुमारे दीड टक्के मतदान कमी झाले. नुकत्याच विधानपरिषद निवडणुकांमध्ये भाजपला बॅकफूटवर यावं लागल्याने, त्यामुळे कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीतले बारकावे आणि इथल्या मतदारांमधील कल तसेच दिग्गजांची घेतलेल्या सभा यामुळं मोठ्या प्रमाणात मतदान होईल असं बोललं जात होतं. पण फिफ्टी- फिफ्टी असं चित्र काल दिसून आलं.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button