ताज्या बातम्यामहाराष्ट्र

आयटीआरमध्ये पुढील महिन्यात होणार मोठे बदल; खिशाला बसणार कात्री?


मुंबई: आर्थिक व्यवहारासंबंधी पुढील म्हणजे ऑगस्ट महिन्यात मोठे फेरबदल होणार आहेत. हे बदल तुमच्या खिशाला कात्री लावणार असल्याने कोणते हे बदल आहे हे जाणून घेणे गरजेचे आहे. या बदलामध्ये क्रेडिट कार्ड ते आयटीआरचा समावेश असणार आहे.
ऑगस्ट महिन्यात बॅंकाना एकूण 14 दिवस सुटी असणार आहे. आणि याच महिन्यांत पैशासंबंधी बदल होऊ घातले आहेत. तेव्हा जे बॅंकेचे काम असणार आहेत ते लवकरात लवकर करुन घेणे गरजेचे आहे.



कॅशबॅकमध्ये होणार कपात?
ऑगस्ट महिन्यांत होऊ घातलेल्या बदलामधील पहिला बद म्हणजे तुम्ही जर एक्सीस बॅंकेचे क्रेडिट कार्ड वापरुन फ्लीपकार्ट वरुनखरेदी केल्यास तुम्हाला 12 ऑगस्टपासून प्रवासाशी संबंधित खर्चासाठी 1.5 टक्के कॅशबॅक एवढे कॅशबॅक मिळणार आहे.

फिक्स डीपॉझिटमध्येही होणार बदल
स्टेट बॅंकेच्या विशेष फीक्स डीपॉझिटची योजना असलेल्या अमृत कलशमध्ये गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख 15 ऑगस्ट असणार आहे. ही 400 दिवसांची मुदत ठेव योजना आहे. त्याचा व्याजदर नियमीत ग्राहकांसाठी 7.1 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.6 टक्के असणार आहे. यासोबतच इंडियन बॅंकेच्या विशेष एफडी सादर केली आहे. तिचे नाव “IND SUPER 400 DAYS” आहे. या 400 दिवसांच्या मुदत ठेव योजनेअंतर्गत 10,000 ते 2 कोटी रुपयांची गुंतवणूक करता येते. यात गुंतवणूक करण्यासाठी 31 ऑगस्ट ही शेवटची तारिख आहे.

आयकर रिटर्न करण्यासाठी उरले फक्त चार दिवस
31 जुलैपर्यंत आयकर रिटर्न भरावा लागणार आहे. तसे न केल्यास दंडाला सामोरे जावे लागणार आहे. त्या दंडाची रक्कम 5 हजार रुपये एवढी असणार आहे. तर ज्यांचे वार्षिक उत्पन्न पाच लाखांपेक्षा कमी आहे, त्यांना 1000 रुपये दंड असेल.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button