Video पंतप्रधान मोदींनी हत्तीवर बसून केली जंगल सफारी…
पंतप्रधान मोदींच्या आसाम दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. पंतप्रधान मोदींनी आज आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाला भेट दिली. यावेळी त्यांनी काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात हत्तीची सफरही केली.
#WATCH | Prime Minister Narendra Modi visited Kaziranga National Park in Assam today. The PM also took an elephant safari here. pic.twitter.com/Kck92SKIhp
— ANI (@ANI) March 9, 2024
माहिती देताना एका अधिकाऱ्याने सांगितले की, पंतप्रधान मोदी शनिवारी सकाळी आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्र प्रकल्पात पोहोचले
Feeding sugar cane to Lakhimai, Pradyumna and Phoolmai. Kaziranga is known for the rhinos but there are also large number of elephants there, along with several other species. pic.twitter.com/VgY9EWlbCE
— Narendra Modi (@narendramodi) March 9, 2024
राज्याच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर पंतप्रधान शुक्रवारी संध्याकाळी काझीरंगा येथे पोहोचले होते. पंतप्रधान आज जोरहाटमध्ये प्रसिद्ध अहोम जनरल लचित बोरफुकन यांच्या 125 फूट उंच ‘स्टॅच्यू ऑफ शौर्य’चे उद्घाटन करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी आसामच्या दोन दिवसीय दौऱ्यात सुमारे 18,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. तसेच येथे ते एका जाहीर सभेला संबोधित करणार आहेत.