मुस्लीम बहुसंख्यांक असलेल्या देशाच्या नोटेवर गणपतीचा फोटो आहे, कारण..
जगातला सर्वात मोठा मुस्लिम देश, जिथे एकूण लोकसंख्येच्या ८७ टक्के म्हणजेच २० कोटींच्या जवळपास मुस्लिम लोकसंख्या आहे. तर ३ टक्के अर्थातच २ कोटीच्या जवळपास हिंदूंची लोकसंख्या आहे.
थोडक्यात मुस्लिम बहुल देश अन अल्पसंख्यांक असणारा हिंदू समाज आणि या देशाचं नाव आहे इंडोनेशिया !
तुम्ही या देशात कधी गेलाच ट्रिपवर तर एक गोष्ट नक्कीच तुम्हाला नजरेत पडेल, इंडोनेशिया हा मुस्लिमबहुल देश असला तरी त्याची किंचितशी छापही तुम्हाला बघायला मिळणार नाही. तुम्ही जिथे पहाल तिथे तुम्हाला भरपूर हिंदू मुर्त्या दिसून येतील.
नोटेच्या मागील बाजूस एका क्लासरूमचा फोटो आहे. ज्यात विध्यार्थी अभ्यास करतांना दिसतात. हे चित्र सांगते की, इंडोनेशियामध्ये शिक्षणाचे सर्वात महत्वाचे महत्त्व आहे. जितके महत्त्व गणेश जी, देवांतराना दिले जाते त्याच बरोबरीचे महत्व शिक्षणाला दिले जाते.
असेही मानले जाते की, पूर्वी इंडोनेशिया देश हिंदू राजवटीच्या प्रभावाखाली होता. पहिल्या शतकात, येथे हिंदू राज्यकर्त्यांचे राज्य होते, म्हणून या देशातील धर्म आणि संस्कृतीवर हिंदूंचा ठसा ठळकपणे दिसून येतो. आणि त्याचमुळे इंडोनेशियामध्ये सर्वत्र हिंदू देवी-देवतांच्या मूर्ती आणि मंदिरे बांधण्यात आली आहेत.
समस्येत त्रस्त असताना कोणीतरी अर्थमंत्र्यांना देशाच्या करन्सीवर हिंदू दैवत असलेल्या गणपतीचा फोटो लावण्याचा सल्ला दिला.
इंडोनेशियानेही तेच केले आणि करंसीच्या अवमूल्यनातून मुक्तता मिळवली. आर्थिक संकट गेलं आणि त्यानंतर इंडोनेशियाला कधीच चलन अवमूल्यनाचा सामना करावा लागला नाही. म्हणून त्यांच्या करंसीवर गणपतीचे स्थान आहे.
आता यात कितपत तथ्य आहे हे माहिती नाही, त्याचा कोणताही ठोस पुरावा नाही. परंतु इंडोनेशियाचे लोकं असं म्हणतात..