सोन्याने भरलेला ग्रह,पृथ्वीवरील प्रत्येक माणसाच्या वाट्याला 10 हजार कोटी रुपये येतील,सर्व सोनं पृथ्वीवर आणणार कसं?
अवकाशात लाखो तारे आहेत. आकाशातील हे ग्रह तारे नशीब बदलवून टाकतात असं ज्योतिष सांगतात. पण आता खगोलतज्ञही हेच सांगू लागलेत. कारण आकाशातील एक लघुग्रह पृथ्वीवरच्या माणसांची गरिबी दूर करणार आहे.
विश्वास बसणार नाही पण हे पण हे खरं आहे. सायकी- 16 हा लघुग्रह पृथ्वीवरच्या माणसांची गरिबी दूर करेल. सायकी- 16 या लघुग्रहावर सोनं, चांदी, लोह असे मौल्यवान धातूच धातू आहेत. या धातूंमुळे पृथ्वीवरील गरिबी एका दिवसात दूर होईल. याची किंमत 700,000,000,000,000,000,000 ऐवढी आहे.
पृथ्वीवरील प्रत्येक माणसाच्या वाट्याला 10 हजार कोटी रुपये येतील
या ग्रहावर एवढं लोह म्हणजे लोखंड आणि इतर मौल्यवान धातू आहेत की ते विकल्यावर 10 हजार क्वाड्रिलीयन पौंड मिळतील. म्हणजेच 10 हजार या संख्येच्या मागं पंधरा शून्य एवढे पैसे मिळतील. याच हिशोबानं पृथ्वीवरील प्रत्येक माणसाच्या वाट्याला 10 हजार कोटी रुपये मिळतील. सोन्यानं बनलेल्या ग्रहावर पोहचण्यासाठी नासाने एक मिशन हाती घेतले आहे. Psyche Mission असे नासाच्या या मोहिमेचे नाव आहे. NASA चे यान सोन्यानं बनलेल्या ग्रहाकडे झेपावले आहे. या ग्रहावर 700,000,000,000,000,000,000 म्हणजेच 700 क्विंटिलियन डॉलर्स ऐवढ्या किंमतीचे सोनं असल्याचा दावा केला जात आहे.
2026 मध्ये नासाचे यान सोन्याच्या ग्रहावर पोहचणार
सायकीचं आकारमान 226 किलोमीटर एवढंच आहे. 16Psyche Gold Planet आपल्या सूर्याभोवती एक परिक्रमा पूर्ण करण्यासाठी पाच वर्षांचा कालावधी लागतो. या लघुग्रहावर एक दिवस 4.196 तासांचा असतो. या ग्रहाचे वजन पृथ्वीच्या चंद्राच्या वजनाच्या फक्त 1 टक्के आहे. गुरू आणि मंगळ ग्रहादरम्यान हा लघुग्रह आहे. 12 ऑक्टोबर 2023 रोजी ‘स्पेसएक्स’ने नासाच्या केनेडी स्पेस सेंटरमधून NASA Psyche यान अवकाशात झेपावले. 2026 पर्यंत हे यान लघुग्रहावर पोहोचणार होते. ऑगस्ट 2029 मध्ये Psyche spacecraft या सोन्याच्या लघुग्रहावर पोहचणार आहे. नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरी (जेपीएल) मधून या अवकाशयानाच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. नासाचे Psyche spacecraft मॅग्नेटोमीटर वापरून या ग्रहाच्या चुंबकीय शक्तीचे मोजमाप करणार आहे.
मौल्यवान धातू पृथ्वीवर आणणं एवढं सोप्पं नाही
17 मार्च 1852 रोजी इटालियन खगोलशास्त्रज्ञ एनिबेल डी गॅस्पॅरिस यांनी या ग्रहाचा शोध लावला. जवळपास सर्वच लघुग्रह खडक, बर्फ किंवा या दोघांच्या मिश्रणाने बनलेले असतात. मात्र,या लघुग्रहावर मोठ्या प्रमाणात धातूचा साठा आढळला आहे. या ग्रहावर प्लॅटिनम, सोने आणि इतर धातू मोठ्या प्रमाणात असल्याचा दावा केला जात आहे. निरीक्षणादरम्यान या ग्रहावर मोठ्या प्रमाणात सोनं आढळून आले आहे. यामुळेच याला Gold Planet असेही म्हंटले जात आहे. या ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी नासाने Psyche Mission हाती घेतले आहे. पण सायकी- 16 वरील मौल्यवान धातू पृथ्वीवर आणणं एवढं सोप्पं नाही. यामुळे संशोधकांनी याबाबत कोणताही खुलासा केलेला नाही. सध्या हे सोनं पृथ्वीवर आणणं म्हणजे फक्त एक क्लपनाच मानले जात आहे.