ताज्या बातम्यामराठा आरक्षणमहत्वाचेमहाराष्ट्रराजकीय

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप,जरांगेंच्या दाव्यानं खळबळ


मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. माझ्यावर हल्ला घडवून आणण्याचा डाव होता, असा आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे.

जरांगे पाटील आजपासून दोन दिवसांच्या संवाद दौऱ्यावर आहेत. दौऱ्यावर निघण्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. छत्रपती संभाजीनगरमध्येच भाजपच्या महिलांना पाठवून माझ्यावर हल्ला करायचा होता, पण त्यांचा तो डाव फसला असा आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे. या आरोपामुळे खळबळ उडाली आहे.

नेमकं काय म्हणाले जरांगे पाटील?

संभाजीनगरमध्येच भाजपच्या महिलांना पाठवून माझ्यावर हल्ला करायचा होता. मात्र त्यांचा तो डाव फसला. मात्र आता पुन्हा भाजपच्या कार्यकर्त्यांकडून माझ्यावर हल्ला करण्याचा डाव देवेंद्र फडणवीसांचा आहे. त्यामुळं मी आता बाहेर निघालो आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांना म्हणा आडवा मला मी घाबरत नाही. असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. सोबतच लोकसभेच्या प्रत्येक जागेवर आम्ही शेकडो फॉर्म भरणार आहोत, मग निवडणुकीचं कसं होईल असा इशाराही यावेळी जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की आता हा त्यांचा शेवटचाच डाव आहे, त्यांची दडपशाही सुरू आहे. तीन -चार दिवसांपासून पाहात आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सांगण्यावरून रस्तारोक करणाऱ्यांविरोधात खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. चलो मुंबईचे बोर्ड काढण्याचा आदेश पोलिसांना देण्यात आला असल्याचं यावेळी जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button