ताज्या बातम्या

मुलांच्या कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळणे गरजेचे – अॅड. नितीन ठाकरे


 

मुलांच्या कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळणे गरजेचे – अॅड. नितीन ठाकरे

नाशिक : मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून जीवन केशरी मराठी युट्यूब चॅनेलचे प्रमुख प्रसाद भालेकर ह्यांच्या वतीने नाशिक शहरात घेण्यात आलेल्या वक्तृत्व व निबंध स्पर्धेचे निकाल जाहीर झाले आहेत. नाशिक शहरातील इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ह्या स्पर्धेस संपूर्ण शहरातून उदंड प्रतिसाद लाभला . वक्तृत्व व निबंध स्पर्धेत सुमारे २०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.

वक्तृत्व स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे

१) तेजल नंदकुमार निकम – प्रथम क्रमांक
वाघ गुरूजी बाल शिक्षण मंदिर, नाशिक
२) ओमकार सुरज देवरे – द्वितीय क्रमांक
पेठे विद्यालय, नाशिक
३) कनक अजयकुमार गुप्ता – तृतीय क्रमांक
वाघ गुरूजी बाल शिक्षण मंदिर, नाशिक
४) उत्तेजनार्थ क्रमांक:- श्रेया दिवाकर इंगळे
जनता विद्यालय गोरेराम लेन, नाशिक

निबंध स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे

१) रोहिणी प्रविण गांगुर्डे – प्रथम क्रमांक
जनता विद्यालय, पवननगर, सिडको
२) संकेत सुनील नागरे – पुरषोत्तम इंग्लिश स्कूल, नाशिक
३) प्रतिक्षा गोरखनाथ बागुल – जनता विद्यालय, पवननगर, नाशिक
४) गौरी संतोष नारखेडे – उत्तेजनार्थ क्रमांक
होरायझन इंग्लिश स्कूल, नाशिक

स्पर्धेच्या आयोजनाचा मुलभूत हेतू हा विद्यार्थ्यांच्या विचारांना योग्य व्यासपीठ मिळावे हाच होता. स्पर्धा हि ऑनलाईन पद्धतीने पार पडली‌. विजेत्यांचे सन्मानपत्र+ बक्षीस हे त्यांच्या शाळेत पोहचविण्यात येणार आहे. सन्मानपत्राद्वारे मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे, नाशिक पूर्व विधानसभाचे आमदार अॅड. राहुल ढिकले, दै.भ्रमरचे संपादक श्री. चंदुलाल शहा , मराठा समाज ‘सय’ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. विजय खैरे ह्या मान्यवरांनी विजेत्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. स्पर्धेच्या आयोजनात आदित्य रिकामे, ओम क्षिरसागर, ओमकार कुटे ह्यांचे सहकार्य मिळाले.

 

प्रतिक्रिया

“ मुलांच्या विचारांना व त्यांच्या कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळावे यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील असतो. आणि त्याच हेतूने आम्ही मराठी राजभाषा दिनानिमित्त वक्तृत्व व निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते. आणि ह्यात आम्हाला नाशिक शहरातील तमाम शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक , विद्यार्थी व पालक ह्यांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार.
– प्रसाद भालेकर , आयोजक

२) “ विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळणे व योग्य व्यासपीठ मिळणे हे गरजेचे आहे. ”
:- अॅड. नितीन ठाकरे, सरचिटणीस, मविप्र नाशिक


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button