मोठी बातमी वैयक्तीक टीकाटिप्पणी करू नये,जरांगे समाज हिताची मागणी करत असतील तरच समाज सोबत राहील – सुनील नागणे

पंढरपूर : मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे जर राजकीय भाषा बोलत असतील आणि वैयक्तीक टीकाटिप्पणी करू नये,जरांगे समाज हिताची मागणी करत असतील तरच समाज सोबत राहील सकल अशी रोखठोक भूमिका मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक सुनील नागणे यांनी घेतली आहे.
मनोज जरांगे राजकीय भाषा बोलणार असतील तर मराठा समाज त्यांच्या सोबत राहणार नाही असं मराठा क्रांती मोर्चाने म्हटलं आहे.
मनोज जरांगे आणि सत्ताधारी यांच्यातील राजकीय टीकेवरून राज्यात आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहे. अशातच मराठा आरक्षण आंदोलनातील नेते सुद्धा उघडपणे जरांगे यांच्या राजकीय टीकेला विरोध करताना दिसत आहेत.
सरकार आरक्षण साठी पूर्ण प्रयत्न करताना सध्या राजकीय टीकेची गरज नव्हती. जरांगे यांनी संयम बाळगण्याची गरज असल्याचे मत सकल मराठा समाजाचे नेते सुनील नागणे यांनी व्यक्त केलं आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याबाबत मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचे शब्द मागे घेत दिलगिरी व्यक्त केली आहे. आई-बहिणीवरून बोलले असेल तर आपण दिलगिरी व्यक्त करतो, असं जरांगे पाटील म्हणाले आहेत. ‘अनावधानाने माझ्याकडून ते शब्द गेले असतील, कारण माझ्या पोटात 17-18 दिवसाचं अन्न नव्हतं.
उपोषणावेळी चिडचिड असते. माता-माऊली, माय-बहिणींना मी मानतो. आई-बहिणीवरून बोलणं योग्य आहे का? असा विषय त्यांनी पटलावर मांडला. आई-बहिणीवरून माझ्याकडून शब्द गेले असतील तर ते शब्द मी मागे घेतो आणि दिलगिरी व्यक्त करतो’, अशी प्रतिक्रिया जरांगे पाटील यांनी दिली.
‘सगेसोयरेची अंमलबजावणी घेतल्याशिवाय मी मागे हटू शकत नाही. त्यांना ज्या काही चौकश्या करायच्या आहेत त्या करू द्या. यंत्रणा त्यांच्या आहेत त्यांना पाहिजे तशा त्यांनी चालवू द्या. मराठा समाजासाठी आयुष्यभर जेलमध्ये सडायला तयार आहे. लढायलाही तयार आहे. मी ओबीसीतून आरक्षण आणि सगेसोयरेची अंमलबजावणी घेतल्याशिवाय एक इंचही हटूच शकत नाही’, असं वक्तव्य जरांगे पाटील यांनी केलं.