मृतदेह उघड्या जागेत ठेवला जातो. यानंतर हा मृतदेह गिधाडे, गरुड आणि इतर पक्षी खातात अस घडत तरी कुठे ?
आपल्या देशात हिंदू, मुस्लीम, शीख, ख्रिश्चन, पारशी अशा सर्व समुदायाचे लोक राहतात. प्रत्येक समाजाच्या प्रथा आणि परंपरा या वेगवेगळ्या असतात. हिंदू धर्मात एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह जाळला जातो.
तर मुस्लीम आणि ख्रिश्चन धर्मामध्ये मृतदेह पुरला जातो. मात्र पारसी समाजात मृतदेह जाळतही नाहीत आणि पुरतही नाहीत. या समाजात मृतदेहाची विल्हेवाट कशी लावली जाते ते जाणून घेऊयात.
पारशी समाजातील लोकांची अशी मान्यता आहे की, अग्नी, पाणी आणि जमीन पवित्र आहे. त्यामुळे एखाद्याचा मृत्यू झाल्यास मृतदेह जाळला जात नाही कारण अग्नी अशुद्ध होऊ शकतो. तसेच मृतदेह पुरला तर पृथ्वी अशुद्ध होईल, आणि मृतदेह पाण्यात टाकला तर पाणी दूषित होईल त्यामुळे मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी वेगळी प्रथा आहे.
पारशी धर्म हा इतर धर्मापेक्षा वेगळा आहे. या धर्मातील अनेक प्रथा सामान्य लोकांना माहिती नसतील. पारशी समाजात अंतिम संस्कार करण्याची पद्धत वेगळी आहे. पारशी समाजात जेव्हा एखाद्याचा मृत्यू होतो तेव्हा मृतदेह टॉवर ऑफ सायलेन्स म्हणजेच दख्मा येथे नेला जातो, आणि तिथे त्याची विल्हेवाट लावली जाते.
टॉवर ऑफ सायलेन्स हे असे ठिकाण आहे जिथे एक गोलाकार जागा बनवलेली असते. पारशी समाजात मृत्यू झाल्यावर मृतदेह या टॉवर ऑफ सायलेन्स जवळ ठेवला जातो. म्हणजेच मृतदेह उघड्या जागेत ठेवला जातो. यानंतर हा मृतदेह गिधाडे, गरुड आणि इतर पक्षी खातात. अशा प्रकारे निसर्गाला कुठलीही हानी न पोहचवता मृतदेह नष्ट होतो.
दरम्यान, पारशी समाजात अंत्यसंस्काराची ही परंपरा जवळपास 3 हजार वर्षांपासून सुरू आहे. प्राचीन काळात पक्षांची संख्या जास्त असायची त्यामुळे मृतदेहाची पटकन विल्हेवाट लागायची. मात्र काळानुसार गिधाड आणि गरुडांची संख्या कमी झाली आहे, त्यामुळे पारशी समाजातील लोकांना अंत्यसंस्कार करण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच जगातील इतरही अनेक समाजांमध्ये अंतिम संस्कार आणि इतर धार्मिक परंपरांची पद्धत वेगवेगळी आहे.