ताज्या बातम्यादिल्ली

नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या गाडीला दिल्लीत भीषण अपघात!


नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कारचा (Hemant Godse car accident) नवी दिल्लीमध्ये भीषण अपघात झाला

 

आहे. राजधानी दिल्लीतील (Delhi) बी डी मार्गावर अपघात झाल्याचं समोर आहे.

या अपघातमध्ये हेमंत गोडसे (MP Hemant Godse) थोडक्यात बचावले आहेत. सुदैवाने या अपघातात हेमंत गोडसे यांना मोठी दुखापत झाली नाही. मात्र त्यांच्या गाडीचे मोठे नुकसान झालं आहे. अपघाताचं कारण अद्याप समोर आलेले नाही.

हेमंत गोडसे दिल्लीत येत होते. बी डी मार्गावर त्यांच्या वाहनाला अपघात झाला. त्यांच्या कारचं मोठं नुकसान झालं आहे.

अपघात इतका भीषण होता की त्यांच्या कारचा अक्षरश: चक्काचूर झाला. सुदैवाने हेमंत गोडसे यांना मोठी दुखापत झालेली नाही.

 

या भीषण अपघातातून हेमंत गोडसे बचावले आहेत. गोडसे यांच्याशिवाय त्यांच्यासोबत असणारे सहकारीही सुरक्षित आहेत. मात्र त्यांच्या गाडीचं मोठं नुकसान झाल्याची माहिती आहे.

हेमंत गोडसे यांच्या गाडीला जोरदार धडक –

हेमंत गोडसे दिल्लीतील बी डी मार्गावरुन जात होते. ते इनोव्हा MH 15 FC 9909 या गाडीने प्रवास करत होते. त्यावेळी त्यांच्या गाडीला पाठीमागून आर्टिका डीएल 7CW 2202 या गाडीने जोरदार धडक दिली. यामध्ये हेमंत गोडसे यांच्या गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. सुदैवानं या अपघातामध्ये कुणालाही मोठी दुखापत झाली नाही.

राज्यसह देशभरात आज शिवजयंतीचा उत्साह आहे. राजधानी दिल्लीतही शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं आहे. नाशिकचं ढोल पथक या शिवजयंती सोहळ्याला दरवर्षी उपस्थित असतं. महाराष्ट्र सदनात या ढोलपथकाचं वादन असतं. याच कार्यक्रमाला हेमंत गोडसे जात होते का? याबाबतची माहिती अद्याप उपलब्ध नाही.

कोण आहेत हेमंत गोडसे ?

हेमंत गोडसे हे सध्या शिवसेना शिंदे गटात असून ते नाशिकचे विद्यमान खासदार आहेत. हेमंत गोडसे यांच्या राजकारणाची सुरुवात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून झाली. २००७ ते २०१२ या काळात नाशिक जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले. पुढे २०१२ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत विजय मिळवित त्यांनी शहराच्या राजकारणात प्रवेश केला. तत्पूर्वी, २००९ च्या निवडणुकीतही त्यांनी ‘मनसे’तर्फे प्रथमच खासदारकीची निवडणूक लढवली होती. त्यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. 2014 सालच्या निवडणुकीत छगन भुजबळ यांचा पराभव करून हेमंत गोडसे हे पहिल्यांदा नाशिकचे खासदार झाले. तर 2019 साली खासदार

हेमंत गोडसे व राष्ट्रवादीचे माजी खासदार समीर भुजबळ यांच्यातच सरळ लढत झाली. यावेळी हेमंत गोडसे हे पुन्हा निवडून आले आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button