थेट परराष्ट्र मंत्रालयात नोकरीची संधी; परीक्षा न देता मिळणार नोकरी
सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांना सुवर्णसंधी आहे. परराष्ट्र मंत्रालयात कन्सल्टंट अर्थात सल्लागार पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.
उच्चशिक्षित व अनुभवी उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेबाबत परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आलं असून, त्यात पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, नियुक्ती झाल्यानंतर देण्यात येणारं वेतन आदींबाबत सविस्तर तपशील देण्यात आला आहे. चला सविस्तर जाणून घेऊयात.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख देखील जवळ आलीये. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ फेब्रुवारी आहे.इच्छुकांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावे लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. यामुळेच उमेदवारांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरतीसाठी अर्ज करावा.
परराष्ट्र मंत्रालयात अर्ज करण्यासाठी पात्रता :
अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पुरातत्व किंवा संवर्धन किंवा संग्रहालयात पदव्युत्तर पदवी/पदव्युत्तर, पदव्युत्तर डिप्लोमा किंवा त्याहून अधिक सिव्हिल/ स्ट्रक्चरल इंजिनीअरिंग/ आर्किटेक्चरमधील अभियांत्रिकी पदवी असणे आवश्यक आहे. याशिवाय उमेदवाराकडे वारसा विकास प्रकल्प जसे उत्खनन, पुनर्स्थापन आणि संरक्षण, संग्रहालय विज्ञानच्या संबंधित कार्य, आइकनोग्राफी सर्वेक्षणमध्ये १० वर्षांचा अनुभव असायला हवा. तुम्ही केलेल्या कामाचे पुरावे डिजाइनिंग, डीटीपी, सोशल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव असायला हवा.
वेतन :
परराष्ट्र मंत्रालय भरती २०२४ च्या अधिकृत पत्रानुसार ज्या उमेदवारांची निवड या पदासाठी होईल अशा उमेदवारांना प्रतिवर्ष ८.४० लाख रुपये पगार दिला जाईल. जे उमेदवार पदासाठी दिलेले नियम पूर्ण करतील अशांनी अर्जाचा फॉर्म भरून संबंधित कागदपत्र दिलेल्या पत्त्यावर पाठवायची आहेत. किंवा उमेदवार [email protected] ईमेलवर देखील त्यांचा अर्ज पाठवू शकतात.
वयोमर्यादा :
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना वयाची अट देखील लागू करण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे कमीत कमी वय हे ३५ आणि जास्तीत जास्त वय हे ६० असावे.