कॉन्स्टेबलच्या पत्नीशी त्याचे अनैतिक संबंध अन हत्या काय आहे प्रकरण ?
हल्द्वानी : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. अनैतिक संबंधातून हत्या, आत्महत्या तसेच बलात्काराच्याही घटना घडताना दिसत आहेत. यातच आता आणखी एका घटनेत धक्कादायक घटना खुलासा झाला आहे.
उत्तराखंडच्या हल्द्वानीमध्ये 8 फेब्रुवारीला झालेल्या हिंसाचारात अनेकांचा मृत्यू झाला. तसेच अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले. मृतांमध्ये बिहारमधील 25 वर्षीय प्रकाश कुमार सिंह याचाही समावेश होता. प्रकाश नोकरीच्या शोधात हल्द्वानी येथे आला होता आणि येथील हिंसाचारात त्याचा मृत्यू झाला. गोळी लागल्याने त्याचा मृत्यू झाला होता, असे सांगण्यात आले होते.
त्याचा मृतदेह हा बनभूलपुरा पोलीस ठाणे हद्दीतील रेल्वे रुळाजवळ आढळला होता. यानंतर पोलिसांनी याप्रकरणाचा तपास केला असता धक्कादायक खुलासा केला आहे. उत्तराखंड पोलिसातील एका कॉन्स्टेबलच्या पत्नीशी त्याचे अनैतिक संबंध होते आणि प्रकाश तिला ब्लॅकमेल करत होता. याप्रकरणी पोलिसांनी एका कॉन्स्टेबलसह चौघांना अटक केली आहे. तसेच आरोपी पत्नी अद्याप फरार आहे.
नैनीतालचे एसएसपी प्रह्लाद नारायण मीणा यांनी याबाबत घटनेचा खुलासा करताना सांगितले की, 9 फेब्रवारीला बनभूलपुरा पोलिसांना इंद्रानगर रेल्वेफाटकच्या पुढे एक मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली होती. यानंतर या मृतदेहाची ओळख पटवण्यात आली. तपासात हा मृतदेह बिहारच्या भोजपुर सिन्हा येथील छिने गावातील रहिवासी प्रकाश कुमार सिंह या तरुणाचा असल्याचे समोर आले. त्याच्या मृतदेहावर गोळ्या झाडल्याच्या खुणा होत्या. असे सांगितले जात होते की, 8 फेब्रुवारीला झालेल्या हिंसाचारात प्रकाशची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. यानंतर पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करत याप्रकरणी तपास सुरू केला होता.
तपासात धक्कादायक माहिती समोर –
एसएसपीने सांगितले की, तपासादरम्यान, प्रकाशच्या मोबाईलची चौकशी करण्यात आली. एसओजी आणि सर्व्हिलांस यांची घेण्यात आली असता अशी माहिती समोर आली की, तो सितारगंज येथील एका तरुणाच्या संपर्कात होता. तसेच प्रकाश उत्तराखंडच्या आणखी एका फोन नंबरवर कॉल करायचा. पोलिसांनी पकडलेला आरोपी सूरजने सांगितले की, त्याची प्रकाशसोबत अडीच वर्षांपासून मैत्री होती. त्याच्या घरी त्याचे येणे-जाणे होते. यादरम्यान, प्रकाशने सूरजची बहीण आणि आरोपी कॉन्स्टेबल बिरेंद्र सिंगची पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेवले. प्रकाशने दोघांच्या शारिरीक संबंधांचा व्हिडिओ बनवला आणि त्यानंतर तो या महिलेला ब्लॅकमेल करून पैशांची मागणी करू लागला. पीडित महिलेने ही बाब आपल्या पतीला सांगितली नाही.
7 फेब्रुवारीला प्रकाशने बिरेंद्र सिंह याला फोन केला. यानंतर बिरेंद्रच्या पत्नीला आपल्या पतीला सर्व काही सांगितले. यानंतर बीरेंद्रने आपली पत्नी आणि आपला एक सहकारी नईम खान याच्यासोबत मिळून प्रकाशच्या खूनाचा कट रचला. पोलीस कॉन्स्टेबल बिरेंद्र सिंह याने आपल्या पत्नीच्या माध्यमातून प्रकाशला हल्द्वानी येथे बोलावले. बिरेंद्रने प्रकाशला पत्नाचा व्हिडिओ डिलिट करायला सांगितला. मात्र, त्याने असे करायला नकार दिला. यानंतर त्याने प्रकाशची गोळ्या झाडून हत्या केली आणि या घटनेला वेगळा अँगल देण्यासाठी प्रकाशच्या मृतदेहाला हिंसाग्रस्त भागात फेकला.
एसएसपी पीएन मीणा यांनी सांगितले की, याप्रकरणी कान्स्टेबल बिरेंद्र सिंह, नईम खान, सूरज बाईन आणि प्रेम सिंह या चौघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला आहे. घटनस्थळावरुन पिस्तूल जप्त करण्यात आली आहे. अद्याप प्रियंका फरार आहे. पोलीस तिचा शोध घेत आहेत