आम्ही मराठा आरक्षण देणार, जरांगेना आरक्षण पटेल की नाही माहित नाही पण मराठा समाजाला पटेल – देवेंद्र फडणवीस

आम्ही मराठा आरक्षण देणार, जरांगेना
आरक्षण पटेल की नाही माहित नाही
पण मराठा समाजालाही पटेल : देवेंद्र फडणवीस
सध्या मराठा आंदोलन सुरु आहे, त्याला काउंटर ओबीसी आंदोलन सुरु आहे. याला पॉलिटिकल अँगलने मी पाहत नाही. प्रत्येकला जातीतून पाहायचं आहे, हे महाराष्ट्र साठी दुर्दैवी आहे. आम्ही आंदोलनाला सकारात्मक पाहत आहोत. आम्ही मराठा समजला आरक्षण देणार आहोत, ओबीसी आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही. आरक्षण देणं हे राज्याच्या हातात आहे, केंद्र सकाराने सुद्धा सांगितलं आहे की राज्य आरक्षण देऊ शकतो. मनोज जरांगे यांना आरक्षण पटेल की नाही माहित नाही पण मराठा समजाला आरक्षण पटेल मान्य होईल. आरक्षण मिळावं यासाठी डेटा आम्ही गोळा करत आहोत, सर्वोच्च न्यायालयने आधी जो निर्णय दिला त्यानंतर आम्ही यावर काम करतोय, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.