बीड कपिलधार धबधबा हिरवळीने नटला,पर्यटकांची गर्दी
बीड : जिल्ह्यात दमदार पावसामुळे जिल्ह्यातील कपिलधार धबधबा ओसंडून वाहू लागला आहे.
हिरवळीने नटलेल्या निसर्गरम्य परिसरातील हा धबधबा सर्वांच्याच आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला आहे. धबधबा फेसाळला असून पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. श्री मन्मथ स्वामींचे (Shri. Manmath Swami) समाधी स्थळ असलेल्या कपिलधारची ओळख महाराष्ट्रातच नव्हे तर परराज्यात देखील आहे. बीड तालुक्यातील कपीलधार हे क्षेत्र वीरशैव समाजाचे श्रद्धास्थान आहे.
या ठिकाणी मन्मथस्वामी यांची संजीवन समाधी आहे. जुलैच्या सुरूवातीपासून झालेल्या पावसाने जिल्ह्यातील बरेच नदी नाले ओसांडून वाहू लागले आहेत. यातच निसर्गाच्या सौंदर्यात भर टाकणारे धबधबे देखील खळखळून वाहत आहेत. कपिलधार धबधबा उंचावरून कोसळत असल्याने या ठिकाणी पर्यटक तसेच भाविकांची गर्दी उसळत आहे.
उंच कड्यावरून दरीत झेपावणारा हा जलप्रपात पाहण्यासाठी बीड जिल्ह्यासह बाहेरील देखील पर्यटक गर्दी करू लागले आहेत.
कपिलधार महाराष्ट्रातील वीरशैव समाजाचे श्रद्धास्थान आहे. या ठिकाणा संत शिरोमणी मन्मथस्वामी यांची संजीवनी समाधी आहे. या समाधीला 459 वर्षे पूर्ण झाली आहेत.
याच परिसरात धबधबा असून तो पर्यटकांना आकर्षित करून घेतो. विशेष म्हणजे पर्यटन विभागाचा ‘ब’ दर्जा देखील या ठिकाणाला प्राप्त झाला आहे. पावसाळ्यामध्ये या पर्यटनस्थळाला मोठी गर्दी पहायला मिळते. स्वामी हे मूळचे निंगुर येथील.
निवासी माता पार्वती आणि शिवलिंग स्वामी यांच्या उदरात मन्मथ स्वामींचा जन्म झाला. मन्मथ स्वामी यांनी मानूर मठ येथे बसवराज शिवाचार्य महाराज यांच्या अंतर्गत विद्या अभ्यास पूर्ण केला. वीरशैव धर्माचा प्रचार स्वामींनी महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटक अशा राज्यात केला. श्रावण महिन्यात यात्रा कार्तिकी पौर्णिमेला या ठिकाणी मोठा धार्मिक महोत्सव असतो.