रमजान ईदपूर्वी बांग्लादेशकडून भारताकडे कांदा आणि साखरेची मागणी दोन्ही देशांमध्ये सकारात्मक चर्चा!
मुस्लिम बांधवांचा रमजान हा सण दोन महिन्यांवर येऊन (Agri Export) ठेपला आहे. अशातच आता रमजान ईदपूर्वी भारतातातून बांग्लादेशला साखर आणि कांद्याची निर्यात केली जाणार आहे.
यात प्रामुख्याने दोन्ही देशांच्या प्रतिनिधींच्या झालेल्या बोलणीनुसार, 50 हजार टन साखर आणि 20 हजार टन कांदा निर्यात करण्याबाबत सहमती झाली आहे. विशेष म्हणजे सध्या साखर आणि कांदा निर्यातीवर भारतात बंदी आहे. मात्र, बांग्लादेशला झालेल्या चर्चेनुसार ही निर्यात केली जाणार आहे. परिणामी अल्प का होईना? निर्यात होणार असल्याने शेतकऱ्यांना (Agri Export) काहीसा दिलासा मिळणार आहे.
रमजानपूर्वी होणार निर्यात (Agri Export Sugar, Onion To Bangladesh)
उपलब्ध माहितीनुसार, बांग्लादेशचे वाणिज्यमंत्री यांनी भारतीय वाणिज्य मंत्रालयासोबत साखर आणि कांदा निर्यातीबाबत (Agri Export) चर्चा केली आहे. दोन्ही बाजूने सकारामक पद्धतीने झालेल्या चर्चेमध्ये आगामी रमजान ईद सणापूर्वी भारतातून बांग्लादेशमध्ये 50,000 टन साखर आणि 20,000 टन कांदा पाठविण्याबाबत बोलणी झाली आहे. बांगलादेशच्या किरकोळ बाजारामध्ये सध्या कांद्याचे दर प्रति किलो १०५ टकापर्यंत (बांग्लादेशी करन्सी) पोहचले आहेत. त्यामुळे सणासुदीच्या काळात ग्राहकांच्या रोषाला सामोरे जावे लागू नये, म्हणून बांग्लादेशकडून भारताकडे कांदा आणि साखरेची मागणी करण्यात आली आहे.
सरकारी संस्थांमार्फत निर्यात
याबाबत बांग्लादेश सरकारकडून भारतीय वाणिज्य मंत्रालयाला एक पत्र पाठवण्यात आले होते. तसेच दोन्ही देशांच्या वाणिज्य मंत्र्यांमध्येही याबाबत चर्चा झाली आहे. भारतामध्ये जून 2023 पासून साखर निर्यातीवर पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. तर ८ डिसेंबर २०२३ पासून कांदा निर्यातीवर पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. मात्र, शेजारील नेपाळ आणि बांग्लादेश या देशांमध्ये काही परिस्थितीमध्ये सरकारी पातळीवरून निर्यात करण्यास सूट देण्यात आली आहे. त्यानुसार, नेपाळ आणि बांग्लादेश या देशांना ही साखर, कांदा निर्यात केली जात आहे. ही निर्यात केंद्र सरकारच्या सहकारी संस्थांमार्फत केली जात आहे.