छत्रपती संभाजीनगरात तुफान राडा; दगडफेकीत 5 गंभीर, 64 जणांना अटक
छत्रपती संभाजीनगर : शहरातून मोठी बातमी समोर आली आहे. दोन गटात तुफान राडा रस्त्याच्या वादातून हा राडा झाल्याची माहिती समोर येत आहे. दोन गटात तब्बल दीड तास दगडफेक सुरू होती, यात पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळी अश्रू -धुरांच्या नळकांड्यांचा देखील वापर केला.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, ही घटना पडेगावमधील आहे. एका घरासमोर 4 मुले बसल्याच्या कारणावरून दोन गटांत वादावादी झाली. या वादावादीचे रुपांतर लाठ्या-काठ्या आणि दगडफेकीमध्ये झाले. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच उपायुक्त नितीन बगाटे यांच्या नेतृत्वात पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी आला. दोन्ही गटांतील 64 जणांना अटक केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
‘गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्यावरून वाद आहे. विरोधी गटाचे लोक रस्त्याने जाण्यापासून अडवणूक करतात. सोमवारी त्याच रस्त्याने जात असताना काहींनी वाद उकरून काढला. त्यानंतर 40 ते 50 लोकांनी हातातील लाठ्या-काठ्या, दांडे, लोखंडी रॉड, तलवारी आणि दगडाने मारहाण केली. या घटनेत अनेक जण गंभीर जखमी झाले,’ असं शेख आरेफ यांनी आपल्या फिर्यादीत म्हटलं आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.