मोठी बातमी! धनंजय मुंडे यांना कोरोनाने घेरले ; पुण्यातील घरी क्वारंटाईन
राज्यामध्ये दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत. अशातच एक खळबळून टाकणारी बातमी समोर आली आहे. राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे.
आज प्रकृतीमध्ये बिघाड झाल्यामुळे धनंजय मुंडे रुग्णालयात गेले होते. येथे त्यांच्या काही चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांमध्ये त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे सध्या ते त्यांच्या पुण्यातील राहत्या घरी क्वारंटाईन आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार, गेल्या चार-पाच दिवसांपासून धनंजय मुंडे यांना खोकल्याचा त्रास होत होता. तसेच अशक्तपणा देखील जाणवत होता. त्यामुळे आज त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. या चाचणीच्या माध्यमातूनच ते पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आता त्यांच्यावर घरीच उपचार प्रक्रिया सुरू आहे. तसेच त्यांना पुण्यातील राहत्या घरी क्वारंटाईन करण्यात आले आहे.
दरम्यान, राज्यात दररोज कोरोना रुग्णांच्या संकेत वाढ होत चालली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला आहे. या बैठकीच्या माध्यमातून त्यांनी करना विरोधात लढा देण्यासाठी महापालिकांना आणि आरोग्य यंत्रणेला सज्ज राहण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत.
https://maharashtranews24.co.in/?p=1052