मनोज जरांगेंच्या बीडमधील इशाऱ्यानंतर CM एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया
मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आरक्षणासाठी २० जानेवारीला ३ कोटी लोक मुंबईला धडकणार असल्याचा इशारा दिला आहे.
मनोज जरांगे यांच्या उपोषणाच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ‘मराठा समाज आणि मनोज जरांगेंनी संयम राखावा, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी बीडमधील इशारा सभेतून २० जानेवारीला ३ कोटी मराठा बांधवांसोबत मुंबईत धडकणार असल्याचा इशारा दिला आहे. मनोज जरांगे यांच्या इशाऱ्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना म्हणाले,’सुप्रीम कोर्टाने क्युरेटीव्ह पीटिशन स्वीकारली आहे. ही पीटिशन ऐकण्यासाठी २४ जानेवारी तारीख दिली आहे. सुप्रीम कोर्टाचा हा मोठा निर्णय मराठा समाजासाठी दिलासादायक आहे. आमची वकिलांची फौज ही मराठा समाज मागास कसा आहे, हे सिद्ध करण्यासाठी ताकद पणाला लावेल’
मला वाटतंय काही लोकांना वाटलं होतं की, रिपीटिशन फेटाळली. त्याप्रमाणे क्युरेटिव्ह पिटिशनही फेटाळली जाईल. परंतु महाविकास आघाडीने रिपिटिशन दाखल केली होती, त्यावेळी त्यांना अपयश आलं. मराठा समाजाची योग्य बाजू मांडण्याचा प्रयत्न झाला नाही. त्यामुळे मराठा समाजाचं आरक्षण रद्द केलं, असं ते म्हणाले.
‘आता आमचे लोक मेहनत करत आहेत. त्यांचं यश फळाला आलं आहे. सुप्रीम कोर्टाने क्युरेटिव पीटिशन ऐकण्यास संमती दिली आहे. त्यांनी २४ तारीख दिली असून मराठा समाजासाठी हा मोठा निर्णय आहे. माझं मनोज जरांगे आणि मराठा समाजाला आवाहन आहे की, सरकार मराठा आरक्षण देण्यासाठी सर्व बाबी कोर्टासमोर आणेन. मराठा समाज मागास कसा आहे, हे सिद्ध करेल. आमची वकिलांची फौज त्याला न्याय देईल. तोपर्यंत मराठा समाजाने संयम राखण्याची आवश्यकता आहे,असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
‘महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था राखणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे सर्वांना आवाहन आहे की, आम्ही कोर्टात योग्य बाजू मांडू. याबाबी कोर्टाद्वारे कायमस्वरुपी आरक्षण देण्याचा प्रयत्न सुरु आहेत. मराठा समाजाला त्यांना न्याय कसा मिळेल, या सर्व बाबी कोर्टात मांडू, असेही त्यांनी सांगितले.
कडक्याचा थंडीत हजारो लोकांचा 1600 KM चा लाँग मार्च, इस्लामाबादला घेराव